भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळत आहे. टी20 विश्वचषकानंतर भारताला न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 31 ऑक्टोबरला झाली. या दौऱ्यामध्ये नवीन खेळाडू बघायला मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षेवर निवडकर्त्यांनी पाणी फेरले.
सध्याच्या काळात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. त्यापैकी काही खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा हाेती. मात्र, असे काही घडले नाही. निवडकर्त्यांनी त्या खेळाडूंकडे साधे लक्षही दिले नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन केले, पण निवडकर्त्यांनी न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
पृथ्वी शॉ
या यादीत पहिले नाव पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे आहे. पृथ्वी शॉ बऱ्याच मोठ्या काळापासून भारतीय संघाच्या बाहेर आहे, मात्र, आता निवडकर्त्ये त्याच्याकडे दूर्लक्ष करत आहेत. भारतीय संघाच्या बाहेर असणाऱ्या या युवा खेळाडूने देशांतर्गत स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने चांगले प्रदर्शन केले आह. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, शॉने 7 सामन्यात 47 च्या सरासरीने आणि 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने 285 धावा केल्या. एवढे असूनसुद्धा निवडकर्त्यांनी या युवा खेळाडूच्या नावाचा साधा विचारही केला नाही आणि हेही तेव्हा, जेव्हा संघातील नियमित खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेला आहे.
नीतीश राणा
नीतीश राणा (Nitish Rana) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने भारतीय संघासाठी आधीच पदार्पण केलेले आहे. मात्र, चयनकर्त्यांना त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. राणाला मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळालेली. या दौऱ्यानंतर त्याला कधीही भारतासाठी खेळण्याची संधी भेटली नाही.
त्यातच, या वर्षी खेळल्या गेलेेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले. या स्पर्धेत खेळलेल्या 7 डावांमध्ये 140 च्या सरासरीने 300पेक्षा जास्त धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना जवळपास 7 च्या इकॉनमीने 11 गडी बाद केले. तरीही भारतीय संघाच्या व्यवस्थापनाने या खेळाडूच्या नावाचा विचारही केला नाही.
रवी बिश्नोई
या यादीत फिरकीपटू रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याला भारतीय संघात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा पर्याय म्हणून पाहिले जायचे. मात्र, आता त्याला संधी देण्यासाठी विचारही केला जात नाहीये. टी20 विश्वचषकाच्या स्टँडबाय लिस्टमध्ये त्याची जागा असतानाही विश्वचषकासाठी कुलदीप यादव याची निवड करण्यात आली. हा खेळाडू भारतासाठी आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 16 गडी बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! बुमराहच्या पत्नीने सोडली पातळी; युजरला सडेतोड प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘तुझं थोबाड चपलीसारखं…’
VIDEO: विराट कोहलीचा ‘माईंड गेम’! इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी शेयर केली ‘ही’ खास पोस्ट