क्रिकेटमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक हे दोघेही महत्वाची भूमिका बजावत असतात. प्रशिक्षक मैदानाच्या बाहेर राहून सामन्यावर नियंत्रण मिळवत असतो. तर कर्णधार हा मैदानाच्या आत राहून सामन्यावर नियंत्रण ठेवत असतो. मैदानाच्या बाहेर जी रणनिती आखली जाते त्याची अंमलबजावणी करायचे काम कर्णधार करत असतो. त्यामुळे कुठल्याही संघाचा कर्णधार चांगला असणं खूप गरजेचं आहे.(best captain’s of asia)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज कर्णधार होऊन गेले, ज्यांनी आपल्या नेतृत्वाच्या बळावर संघाला सामने जिंकून दिले. तसेच पराभूत झाल्यानंतर अनेक कर्णधारांवर टीका देखील करण्यात आली होती. परंतु आपल्या चाणाक्ष बुद्धिचा वापर करत या कर्णधारांनी संघाला बरेच ऐतिहासिक आणि मोठ्या स्पर्धेत विजय मिळवून दिले. अशाच कर्णधारांबद्दल अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आशियातील २ बुद्धिमान कर्णधार
१) अर्जुन रणतुंगा (Arjun ranatunga):
खेळाडू कधी फॉर्ममध्ये असतात तर कधी कधी ते चांगली कामगिरी करण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत असतात. परंतु एक चांगला कर्णधार नेहमीच त्या खेळाडूला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करत असतो. श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्यात देखील नेतृत्वाचे हे गुण कुटून कुटून भरले होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ते एक बुद्धिमान कर्णधार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सनथ जयसुर्यासारखा दिग्गज फलंदाज अर्जुन रणतुंगामुळेच मिळाला आहे. त्यांनी सनथ जयसूर्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली होती. तसेच १५ षटक झाल्यानंतर कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजीला आणायचं, क्षेत्ररक्षण कसं असेल हे त्यांना खूप चांगल जमायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघाने विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता.
२) एमएस धोनी (Ms Dhoni):
एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आपला जलवा दाखवायला सुरुवात केली होती. २०११ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युवराज सिंगपूर्वी फलंदाजीला येणं आणि भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देणं. तसेच २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेत शेवटचे षटक जोगिंदर शर्माला देणं हे दोन्ही निर्णय सर्वांना आश्चर्यचकित करणारे होते. परंतु याच निर्णयामुळे भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या :
…आणि चेतन शर्मा यांच्यावर आली होती तोंड लपवून फिरण्याची वेळ, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
दुसऱ्या कसोटीपूर्वी द्रविडने रहाणे-पुजाराच्या फॉर्मविषयी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाला…
हे नक्की पाहा: