आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुबईच्या, दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला होता. भारतीय संघात असेही काही खेळाडू होते, जे कर्णधार विराट कोहलीचे खूप खास होते. परंतु त्यांना टी२० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले नाहीये. चला पाहूया, कोण आहेत ते खेळाडू?
श्रेयस अय्यर : भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यात चांगले संबंध आहेत. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून देखील माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. त्याची आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. परंतु त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
युझवेंद्र चहल : टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज युझवेंद्र चहलला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्य संघात स्थान देण्यात आले नाहीये. या निर्णयामुळे अनेक दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद केले आहेत. त्याच्या ऐवजी युवा फिरकीपटू राहुल चाहरला संधी देण्यात आली आहे. ज्याने आतापर्यंत फक्त ५ टी-२० सामने खेळले आहेत. युझवेंद्र चहल आणि विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर, हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. तसेच गेली काही वर्ष हे दोघेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मोहम्मद सिराज : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यासह तो देखील विराट कोहलीचा आयपीएलमधील हुकुमी एक्काही आहे. मोहम्मद सिराज आणि विराट कोहली हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एकत्र खेळतात. मोहम्मद सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. परंतु टी -२० विश्वचषक स्पर्धेत तो स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
जमतंय जमतंय! धनश्रीच्या तालात ताल मिसळत पंजाबी गाण्यावर थिरकला चहल, व्हिडिओला चाहत्यांची पसंती
सीएसकेच्या ‘या’ क्रिकेटरची लागणार लॉटरी, धोनी स्वत: मिळवून देणार राखीव खेळाडूंमधून मुख्य संघात जागा!
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘व्हायरल गर्ल’, तमन्ना ते काव्यासारख्या सौंदर्यवतींचा समावेश