ॲडीलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. यासह ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
त्यामुळे इंग्लंड संघाचा या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु, ॲडीलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाने एकही सामना गमावला नाहीये. त्यामुळे इंग्लंड संघाला आणखी जास्त जोर लावावा लागणार आहे. दरम्यान, या सामन्यात बेन स्टोक्स, डेविड वॉर्नर, जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्स यांना विक्रम रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात होऊ शकतात हे ५ मोठे विक्रम
या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटला ५२ धावा करण्यात यश आले, तर त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते. तो एकच वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा कर्णधार ठरू शकतो. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने कर्णधार म्हणून एकाच वर्षात १५९५ धावा केल्या होत्या. तसेच फलंदाज म्हणून एकाच वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तान संघाचा फलंदाज मोहम्मद युसुफच्या नावे आहे. त्याने २००६ मध्ये १७८८ धावा केल्या होत्या.
जेम्स अँडरसनच्या नावे होऊ शकतो हा मोठा विक्रम
जेम्स अँडरसन हा एक उत्तम गोलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही तो मागे नाहीये. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण ९९ झेल टिपले आहेत. जर त्याने या कसोटी सामन्यात एक झेल टिपला, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये १०० झेल टिपण्याचा विक्रम करू शकतो.
स्टार्कला इतिहास रचण्याची संधी
मिचेल स्टार्कला जर २ गडी बाद करण्यात यश आले, तर गिलेस्पीचा विक्रम मोडू शकतो. तो गिलेस्पीला मागे टाकत ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ८ वे स्थान मिळवू शकतो.
जर बेन स्टोक्सला या सामन्यात ३७ धावा करण्यात यश आले. तर तो कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करेल. तसेच या सामन्यात डेविड वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७,५०० धावा करण्याची संधी असणार आहे. असा कारनामा करण्यासाठी त्याला ८६ धावांची आवश्यकता आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये ७,५०० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला ९६ धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानचे पुन्हा हसू! माजी कर्णधारच म्हणतोय, ‘प्रेक्षक कुठे आहेत?’
कसोटीतून निवृत्ती स्वीकारण्याच्या वृत्तावर जडेजाने केले चार शब्दांचे ‘अर्थपूर्ण’ ट्विट