एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस भारतात इंडियन प्रीमियर लीग 2021 चा हंगाम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या सावटाखाली विनाप्रेक्षक आयपीएल सामने खेळवले जात होते. या हंगामातील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर जैव सुरक्षित वातावरणात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अखेर 29 सामन्यांनंतर आयपीएलचा उर्वरित हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आयपीएलचे राहिलेले सामने आयोजण्याचे आवाहन बीसीसीआयपुढे होते.
परंतु शेवटी आयपीएल 2021चे उर्वरित 31 सामने युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, त्यानंतर बीसीसीआयसाठी एक गोष्ट मोठी डोकेदुखी राहिली आहे. ती म्हणजे आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात परदेशी खेळाडूंची उपलब्धता. बऱ्याचशा क्रिकेट बोर्डांचे भविष्यातील व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक किंवा इतर काही कारणामुळे त्यांचे खेळाडू आयपीएलच्या राहिलेल्या हंगामात अनुपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
या लेखात आपण त्या 3 देशांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांचे प्रमुख खेळाडू आयपीएल 2021च्या उर्वरित हंगामात खेळताना दिसू शकत नाहीत.
1. न्यूझीलंड- न्यूझीलंडच्या संघाला 2 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर लवकरच केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाला भारताविरुद्ध आयसीसी विश्वचषक चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर कोविड साथीच्या आजारामुळे न्यूझीलंडचे खेळाडू थेट त्यांच्या देशात परत जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे आयपीएल 2021च्या दुसर्या टप्प्यात केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट आणि काइल जेमिसन यासारखे महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
2. इंग्लंड- आगामी काळात ज्या आंतरराष्ट्रीय संघांचे वेळापत्रक सर्वात व्यस्त आहे, त्यामध्ये इंग्लंड संघाचेही नाव आहे. वास्तविक जो रूटच्या नेतृत्वात इंग्लिश कसोटी संघ 10 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळेल. यानंतर 14 ऑक्टोबरपासून त्यांना पाकिस्तानविरुद्धही मालिका खेळायची आहे.
यावर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडलाही अॅशेससाठी ऑस्ट्रेलिया दौरा करावा लागणार आहे. या दरम्यान बीसीसीआयने सप्टेंबरच्या विंडोमध्येच आयपीएल आयोजित करण्याचे मन बनवले आहे. पण एवढ्या व्यस्त वेळापत्रकात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला त्यांच्या खेळाडूंना काही काळासाठी विश्रांती देण्याची इच्छा असणार आहे. या अर्थाने, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि जोस बटलर या मुख्य खेळाडूंना आयपीएल 2021च्या दुसर्या टप्प्यात विश्रांतीसाठी अवधी दिला जाऊ शकतो.
3. वेस्ट इंडीज- वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघाचे वेळापत्रकही आगामी काळात खूप व्यस्त असणार आहे. कॅरेबियन संघाला मायभूमीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका खेळायच्या आहेत. यानंतर हा संघ आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या तयारीवरही लक्ष केंद्रित करेल. अशात या व्यस्त वेळापत्रकादरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाला आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यास आवडेल. जेणेकरुन आयसीसी टी-20 विश्वचषक होईपर्यंत ते पूर्णपणे उपलब्ध असतील. यामुळे आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्यात कायरन पोलार्ड, ख्रिस गेल आणि अनेक कॅरेबियन दिग्गजांना खेळणे कठीण होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० क्रमवारीत भारतीय क्रिकेटपटूंचा बोलबोला, शेफालीचा अव्वलस्थानी ताबा; तर स्म्रितीही टॉप-५ मध्ये
डायट प्लॅन सांगताच कॅप्टन कोहली झाला ट्रोल, मग दिले ‘हे’ खमंग प्रत्युत्तर
जगावेगळंच नाही का! पाकिस्तानचा कर्णधार आपल्याच बहिणीशी बांधणार लगीनगाठ