पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची सोमवारी (12 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या 15 सदस्यीय संघात सर्वच पारखलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघातील तीन खेळाडूंची संघात निवड झाली असली तरी, बीसीसीआयने त्यांच्यासमोर एक विशेष अट ठेवली आहे.
विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यासमोर बीसीसीआयने एक अट ठेवली आहे. विश्वचषकाच्या ऐन तोंडावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळेल. या मालिकेवेळी हे तिन्ही खेळाडू संघाचा भाग नसतील. या काळात हे तिघे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कंडीशनिंगचा अहवाल देतील. विशेष म्हणजे त्यांना हा अहवाल देणे सक्तीचे केले आहे. दुखापती व तंदुरुस्ती याबाबत माहिती घेण्यासाठी हा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयने याबाबतची प्रेस नोट जाहीर केली आहे.
🚨 NEWS 🚨: India’s squads for ICC Men’s T20 World Cup 2022, Australia & South Africa T20Is announced. #TeamIndia | #T20WorldCup | #INDvAUS | #iNDvSA
More Details 🔽https://t.co/ZFaOXlmduN
— BCCI (@BCCI) September 12, 2022
भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. तिरुअनंतपुरम, गुवाहाटी आणि इंदूर येथे 28 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर रोजी टी20 सामने खेळवले जातील. वनडे सामने 6 ऑक्टोबर, 9 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर रोजी रांची, लखनऊ आणि दिल्ली येथे खेळले जाणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा टी20 संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्या बात! सलग आठ टी20 विश्वचषकात टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ एकमेव खेळाडू
अरे, याला नाही घेणार टीममध्ये! आता ‘तोच’ झालायं भारताच्या टी20 विश्वचषक संघात इन
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व