---Advertisement---

आशिया चषकात टीम इंडियातील हे तिघे पाजणार फक्त पाणीच; एकाच नशीब येणार आडवं

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 3:31 PM
Indian-Asia-Cup
---Advertisement---

तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आशिया चषकाचा विचार केला गेल्यास भारतीय संघातील तीन असे खेळाडू आहेत, ज्यांनी आशियातील या सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खेळण्याचे सौभाग्य मिळण्याची शक्यता काहीशी कमी आहे. त्यांना संपूर्ण स्पर्धेत बाकावर बसून राहावे लागू शकते.

दीपक हुडा

या यादीतील पहिले नाव आहे युवा अष्टपैलू दीपक हुडा याचे. त्याने भारतासाठी आजपर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला आहे. त्यामुळे एकप्रकारे त्याला लकी चार्म म्हणून ओळखले जातेय. मात्र, आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात सर्व प्रमुख फलंदाज निवडले गेले असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहली, रिषभ पंत, दिनेश कार्तिक व हार्दिक पंड्या यांच्या उपस्थितीत त्याला बाकावर बसून राहावे लागू शकते.

आवेश खान

भारतीय वेगवान गोलंदाजीचे भविष्य म्हणून ओळखल्या जात असलेल्या आवेश खान याला देखील आशिया चषकात संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले असून, यात अनुभवी भुवनेश्वर कुमार व  अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. सध्याच्या फॉर्मचा विचार केल्यास भुवनेश्वर व अर्शदीप यांनाच पहिली पसंती मिळू शकते.

रवी बिश्नोई

आशिया चषकासाठीच्या भारतीय संघातील तिसरा असा खेळाडू ज्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे तो म्हणजे फिरकीपटू रवी बिश्नोई. संघात रविचंद्रन अश्विन व युझवेंद्र चहल यांच्यासारखे दोन दिग्गज फिरकीपटू असताना बिश्नोई हा बाकावरच दिसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

शुबमन गिलचा फॅन निघाला ‘हा’ झिम्बाब्वेचा खेळाडू, २५ वर्षानंतर भारताविरुद्ध घेतल्या पाच विकेट्स

तू मेरा हिरो..! मोहम्मद सिराजवर झिम्बाब्वेच्या पोरी फिदा, महिला चाहत्यांची फोटो काढण्यासाठी गर्दी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---