कानपुर । येथील ग्रीन प्रक मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील ३५ वे अर्धशतक केले आहे.
शिखर धवनच्या विकेटनंतर कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली.
रोहित शर्माची हि या मालिकेतील पहिली मोठी खेळी आहे. रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ५२ चेंडू घेतले. त्यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारले. असे करताना त्याने कर्णधार विराट कोहली बरोबर ४९ चेंडूत अर्धशतकी भागीदारी देखील केली.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले. शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोघांनीही भारताला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला पण शिखर धवन टीम साऊदीच्या गोलंदाजी वर २० चेंडूत १४ धावा करून बाद झाला.
त्यानंतर भारताच्या या दोन्ही फलंदाजांनी भारताचे धावफलक ८९ पर्यंत नेले. भारताला आता मोठी धावसंख्या उभरण्यासाठी या दोन खेळाडूंकडून विशेष कामगिरीची अपेक्षा असेल.