पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात कुशल चौधरी, आर्यन हूड, अर्णव पापरकर, अदमीर शेख यांनी, तर मुलींच्या गटात इरा शहा, सानिका भोगाडे, माही शिंदे, अपर्णा पतैत यांनी आपापल्या गटातील प्रतिस्परध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 14वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित इरा शहाने गार्गी फुलेचा 6-0, 6-2 असा तर, पूर्वा भुजबळने कुंजल कंकचा 6-1, 2-6, 6-3असा तीन सेटमध्ये पराभव केला. दानिका फर्नांडोने अन्वेषा दासचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव केला. आठव्या मानांकित माही शिंदेने संस्कृती कायलला 6-0, 6-0असे नमविले.
14वर्षाखालील मुलांच्या गटात अव्वल मानांकित कुशल चौधरीने कुंश गौडाला 6-2, 6-4असे पराभूत केले. शर्विल पाटीलने ऋषिकेश अय्यरचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:14वर्षाखालील मुली:
इरा शहा(1) वि.वि.गार्गी फुले 6-0, 6-2;
पूर्वा भुजबळ वि.वि.कुंजल कंक 6-1, 2-6, 6-3;
दानिका फर्नांडो वि.वि.अन्वेषा दास 6-0, 6-0;
माही शिंदे(8)वि.वि.संस्कृती कायल 6-0, 6-0;
सोहा पाटील(3)वि.वि.ईशान्या हटनकर 3-6, 7-6(1), 6-4;
अपर्णा पतैत वि.वि.संचिता नगरकर 6-1, 6-1;
चिन्मयी बागवे वि.वि.धनवी काळे 6-3, 6-0;
सानिका भोगाडे वि.वि.हिर किंगर 6-3, 6-1;
14वर्षाखालील मुले:
कुशल चौधरी(1)वि.वि.कुंश गौडा 6-2, 6-4;
शर्विल पाटील वि.वि.ऋषिकेश अय्यर 6-3, 6-2;
अंकिश भटेजा(4)वि.वि.वेद ठाकूर 6-1, 6-3;
अदमीर शेख(6)वि.वि.बलवीर सिंग 6-1, 6-4;
आर्यन हूड वि.वि.दक्ष कुकरेती 6-1, 6-1;
अर्णव पापरकर वि.वि.क्रिश करपे 6-1, 6-3.