मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात आजच्या दिवसाची शेवटची लढत झाली. मुंबई उपनगर संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी तर नाशिक संघ आठव्या स्थानी होता. मुंबई उपनगर संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत आघाडी मिळवली. आकाश रुडेले च्या चतुरस्त्र चढायांनी मुंबई उपनगर संघाने नाशिक संघाला ऑल आऊट केले.
रुतिक कांबळी व अक्षय तावडे यांच्या उत्कृष्ट बचावापुढे नाशिक संघाचे चढाईपटू अक्षरशः गुडघे टेकताना दिसले. मध्यांतरा पर्यत मुंबई उपनगर संघाने 27-10 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतरही मुंबई उपनगर संघाने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत नाशिक संघाला ऑल आऊट करत आघाडी भक्कम केली.
आकाश रुडेलेच्या 17 गुणांच्या खेळीने मुंबई उपनगर संघाने 43-33 असा विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. मुंबई उपनगर कडून अक्षय तावडे ने 5 पकडी तर रुतिक कांबळी ने 4 पकडी केल्या. नाशिक कडून शिवकुमार बोरगोडे ने 9 गुण मिळवले तर गणेश गीते ने 8 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- आकाश रुडेले, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
बेस्ट डिफेंडर- अक्षय तावडे, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
कबड्डी का कमाल- यश डोंगरे, मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रमोशन फेरीत अहमदनगर पेरियार पँथर्स संघाचे प्रथम स्थान निश्चित
पुणे पलानी टस्कर्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यातील सामना बरोबरीत