पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत अकराव्या दिवशी पहिल्या लढतीत सिद्धेश वीर(६१धावा व १-१९) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओम भोसले व मुर्तझा ट्रंकवाला या सलामीच्या जोडीने ३२चेंडूत ५३धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. ओम भोसलेने ४८चेंडूत नाबाद ८१धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ११चौकार व १षटकार मारले. त्याला मुर्तझा ट्रंकवालाने ३९चेंडूत ४चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ४४धावांची खेळी करून साथ दिली. मुर्तझा ट्रंकवालाची झंझावती खेळी सिद्धेश वीरने झेल बाद करून संपुष्टात आणली. त्यानंतर, मात्र रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत छत्रपती संभाजी किंग्सच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठवले. ओमकार खाटपे(१), दिग्विजय पाटील(३), दिग्विजय जाधव(८), सौरभ सिंग(१), शामसुझमा काझी(२), स्वराज चव्हाण(२), आनंद ठेंगे(०) हे झटपट बाद झाले. रायगड रॉयल्सकडून सुनील यादव(३-२४), सिद्धेश वीर(१-१९), विकी ओस्तवाल(१-१५)यांनी सुरेख गोलंदाजी करून छत्रपती संभाजी किंग्स संघाला १४६धावावर रोखले.
१४६ धावांचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाने १९.४षटकात ७बाद १४७धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज सिद्धेश वीरने ५३चेंडूत ३चौकार, ३ षटकार मारत ६१धावांची खेळी केली. प्रणय सिंगने स्पर्धेतील महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखला ११ धावांवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर सिद्धेश वीरने मेहुल पटेलच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४५चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. मेहुल पटेलने ३५चेंडूत ४२ धावा केल्या. यात त्याने ३चौकार व १षटकार मारला. त्यानंतर ऋषभ राठोडने २० धावा काढून संघाचा विजय सुकर केला.
निकाल: साखळी फेरी:
छत्रपती संभाजी किंग्स: २०षटकात ८बाद १४६धावा(ओम भोसले नाबाद ८१(४८,११x४,१x६), मुर्तझा ट्रंकवाला ४४(३९,४x४,३x६), सुनील यादव ३-२४, सिद्धेश वीर १-१९, विकी ओस्तवाल १-१५)पराभुत वि.रायगड रॉयल्स: १९.४षटकात ७बाद १४७धावा(सिद्धेश वीर ६१(५३,३x४,३x६), मेहुल पटेल ४२(३५,३x४,१x६), ऋषभ राठोड २०, नौशाद शेख ११, प्रणय सिंग ३-३०,स्वराज चव्हाण २-२१, आनंद ठेंगे २-३६);सामनावीर-