---Advertisement---

मोठी बातमी! आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

On: शनिवार, जुलै 1, 2023 5:31 PM
Cricket
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023 खेळली जात आहे. विशेष म्हणजे, पुरुषांसोबतच महिलांचीही ऍशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. महिला ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेसच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केले आहे. यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघ 3-3 सामन्यांच्या वनडे आणि टी20 मालिकाही खेळायच्या आहेत. या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर एलिसा हिली हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

काय आहे वेळापत्रक?
आयर्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ireland vs Australia) संघात खेळल्या जाणाऱ्या या मालिकेचे आयोजन जुलै महिन्यात होणार आहे. ऍशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया संघा इंग्लंडच्या डबलीनसाठी रवाना होईल. इथे त्यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना 23 जुलै रोजी खेळला जाईल. यानंतर मालिकेचा दुसरा सामनाही त्याच मैदानात 25 जुलै रोजी खेळला जाईल. तसेच, तिसरा सामना 28 जुलै रोजी डबलीन येथेच खेळला जाईल. या मालिकेतील तिन्ही सामने आयसीसी महिला वनडे चॅम्पियनशिपचा भाग आहेत. याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

आपल्याच संघाविरुद्ध खेळणार ‘ही’ खेळाडू
आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलिया संघात एक नाव असे आहे, जो आपल्याच देशाविरुद्ध खेळणार आहे. ही खेळाडू इतर कुणी नसून किम गार्थ आहे. इंग्लंड दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करत असलेली किम गार्थ आपल्या माजी आयर्लंड संघाविरुद्ध खेळणार आहे. खरं तर, गार्थने आयर्लंडसाठी सन 2010मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर तिने आयर्लंडकडून 114 सामने खेळले आहेत. मात्र, 2020मध्ये ती ऑस्ट्रेलिया संघाकडून क्रिकेट खेळू लागली. त्यामुळे ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा ती आपल्या माजी संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. (this cricket board announces team for ireland odi series know here)

आयर्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ
एलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राऊन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---