इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात जात आहे. यादरम्यान अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय टी20 संघात घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. अशातच भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएल 2023 स्पर्धेत समालोचक म्हणून काम करत असलेल्या आकाश चोप्रा याने मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंना टी20 क्रिकेट प्रकारातून हळूहळू केले जाईल.
विशेष म्हणजे, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) हे तिघेही टी20 विश्वचषक 2022मध्ये भारतीय संघाचा भाग होते. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर भारताच्या या सर्वात छोट्या प्रकारात दिसले नाहीयेत.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला की, यशस्वी जयसवाल यांसारखे युवा खेळाडूंनी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात चमकदार कामगिरी केली आहे.
‘पुढील 90 दिवसात बदलतील गोष्टी’
माजी भारतीय सलामीवीराने माध्यमांशी बोलताना भारतीय टी20 संघाच्या पुढील योजनेबाबत चर्चा केली. यावेळी तो म्हणाला की, “मला असे वाटते की, या क्रिकेट प्रकाराच्या आगामी पिढीतील क्रिकेटपटूंची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच, मागील पिढीच्या खेळाडूंना या नवीन योजनेचा भाग बनण्यात समस्या येईल. हे एका वनडे विश्वचषकाचे वर्ष आहे, त्यामुळे भारत उर्वरित वर्षात कमी टी20 सामने खेळेल. मात्र, कितीही सामने खेळो, मला वाटते की, तुम्ही विराट, रोहित किंवा राहुलला खेळताना पाहू शकणार नाहीत. तुम्हाला हेदेखील माहिती नाहीये की, राहुल वास्तवात कधी उपलब्ध असेल. त्यामुळे मी म्हणत आहे की, पुढील 90 दिवसांमध्ये गोष्टी बदलतील.”
खरं तर, आयपीएल 2023 स्पर्धेत यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal), रिंकू सिंग, तिलक वर्मा, अभिनव मनोहर यांसारख्या युवा फलंदाजांनी सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे चाहते आणि क्रिकेटतज्ञांना वाटत आहे की, यांसारखे खेळाडू भविष्यात भारतीय टी20 संघाचे प्रतिनिधित्व करतील. कदाचित जुन्या आणि वरिष्ठ खेळाडूंना आता या सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारात जागा दिली जाणार नाही. बीसीसीआय पुढच्या काळात जुन्या दिग्गज फलंदाजांना अनुभवाच्या आधारे महत्त्व देते की, युवा खेळाडूंच्या खांद्यावर भारतीय संघाची जबाबदारी सोपवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (this former cricketer feels no place for rohit rahul kohli in future india t20i team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या तीन षटकांमध्ये लखनऊची धावसंख्या अचानकच उंचावली! 18व्या षटकात स्टॉयनिसने आणले वादळ
पीटरसनने धोनीला खोटं ठरवलंच, माजी भारतीय कर्णधाराच्या पहिल्या कसोटी विकेटविषयी मोठे भाष्य