एमएस धोनी आणि विराट कोहली या दोन्हीही खेळाडूंची भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणना होते. या दोघांच्याही नेतृत्वात भारताने अनेक सामने जिंकले आहेत. तरीही या दोघांच्या नेतृत्वात भारतीय संघाला तो चमकदार विक्रम आपल्या नावावर करता आला नाही, जो विक्रम भारताने रोहित शर्मा आणि राहुल द्रविडच्या नेतृत्वात मिळविला होता.
द्रविड– रोहितच्या नेतृत्वात भारताने जिंकले सुरुवातीचे तीन सामने
द्रविडच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आपले सुरुवातीच्या 4 वनडे सामन्यांपैकी 3 सामने जिंकले होते. भारतीय संघ 14 डिसेंबर 2000 साली राजकोट येथे द्रविडच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात 39 धावांनी विजय मिळविला होता. कोलंबो येथे 28 जुलै 2001 साली दुसरा सामनाही 7 विकेट्सने जिंकला होता. तसेच, जोधपूर येथे 21 नोव्हेंबर 2002 सालचा तिसरा सामनाही भारताने 3 विकेट्सने जिंकला होता.
याव्यतिरिक्त रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपले सुरुवातीच्या 4 वनडे सामन्यांपैकी ३ सामने जिंकले होते. भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वातील पहिल्या वनडे सामन्यात धरमशाला येथे 10 डिसेंबर 2017ला 7 विकेट्सने पराभूत झाला. दुसरा सामना मोहाली येथे 13 डिसेंबर 2017ला 141 धावांनी भारताने जिंकला. तिसरा सामना भारताने विशाखापट्टणम येथे 17 डिसेंबर 2017 रोजी 8 विकेट्सने जिंकला आणि चौथा सामना 18 सप्टेंबर 2018 रोजी 26 धावांनी जिंकला होता.
असा कारनामा विराट आणि धोनीच्या नेतृत्वात होऊ शकला नाही. धोनीने आपल्या नेतृत्वातील सुरुवातीच्या 4 वनडे सामन्यांपैकी केवळ 1 सामन्यात विजय मिळविला होता. 1 सामना अनिर्णित राहिला, तर बाकीच्या 2 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला होता.
रोहित आणि द्रविड दोघेही उत्कृष्ट कर्णधार समजले जातात. परंतु सौरव गांगुली आणि विराटसारख्या दिग्गाजांकडे नेतृत्त्व असल्याने या दोन्ही भारतीय कर्णधारांना अधिक संधी मिळाल्या नाहीत.
रोहितने आपल्या नेतृत्वात केले आहेत अनेक शानदार विक्रम
रोहितच्या (Rohit Sharma) नावावर नेतृत्व करताना उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने आतापर्यंत केवळ 10 वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये 8 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाला आहेत. रोहितची वनडे क्रिकेटची विजयी टक्केवारी ही 80.00 आहे. केवळ 2 सामन्यांमध्ये भारताने त्याच्या नेतृत्वात पराभवाचे तोंड पाहिले आहे.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकूण 19 टी20 सामने खेळले आहेत. त्यातील भारताने 15 सामने जिंकले आणि केवळ 4 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. रोहितची टी20 क्रिकेटची विजयी टक्केवारी ही 78.94 आहे.
रोहितच्या नेतृत्वातच भारतीय संघाने 2018 चा आशिया चषक आणि निदाहास ट्रॉफी जिंकली होती. त्याने आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघाला आपल्या नेतृत्वात 4 वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे.
द्रविडच्या नेतृत्वात देखील भारताने केलाय हा कारनामा
द्रविडने (Rahul Dravid) ७९ वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यात त्याने 42 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. द्रविडच्या नेतृत्वात 2006 मध्ये भारताने वेस्ट इंडिज येथे कसोटी मालिका जिंकली होती. तसेच, 2007मध्ये इंग्लंड येथे कसोटी मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेत खेळताना द्रविडच्या नेतृत्वातील पहिला कसोटी सामनाही भारताने जिंकला होता. त्याच्या नेतृत्वात भारताने सलग 15 वनडे सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळविला होता. त्याची वनडे क्रिकेटची विजयी टक्केवारी ही 56 आहे.
धोनीबद्दल (MS Dhoni) बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 200 वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याने 110 वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. त्याची वनडे विजयी टक्केवारी ही 59.52 आहे.
याव्यतिरिक्त विराटने (Virat Kohli) आतापर्यंत 89 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याने 62 वेळा विजय मिळवून दिला आहे. त्याची वनडे विजयी टक्केवारी ही 71.83 इतकी आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘या’ ५ दिग्गज खेळाडूंचा जर्सी नंबर केला पाहिजे रिटायर
-आपल्या फलंदाजीने सर्वांना भूरळ पाडणारे जगातील ३ धडाकेबाज खेळाडू
-वनडेत धोनीने त्या ३ धडाकेबाज खेळी करूनही भारताच्या पारड्यात आले नाही यश