---Advertisement---

LSG vs SRH: हैदराबादचा ‘हा’ खेळाडू ठरला लखनऊसाठी डोकेदुखी!

On: मंगळवार, मे 20, 2025 8:06 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतून लखनऊ सुपर जायंट्सचा संघ बाहेर पडला आहे. लखनऊच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने लखनऊचा सहज 6 विकेट्सने पराभव केला आणि 206 धावांचे लक्ष्य 10 चेंडू शिल्लक ठेवत गाठलं. या पराभवासह लखनऊचं प्लेऑफचं स्वप्न सलग दुसऱ्या वर्षी भंगलं आहे.

सनरायझर्स हैदराबादने 206 धावांचे लक्ष्य गाठले आणि हंगामातील त्यांचा चौथा विजय मिळवला. या पराभवामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या हंगामातील लखनऊचा हा 7 वा पराभव आहे.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्सने 20 षटकांत 7 खेळाडू गमावून 205 धावा केल्या.

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी केली आणि सुरुवातीलाच सामना हैदराबादच्या बाजूने वळवला. इशान किशनसह त्याने पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण, दिग्वेश राठीने 8व्या षटकात अभिषेकला बाद करून लखनऊला दिलासा दिला. असे असूनही, सनरायझर्सच्या फलंदाजांनी दबाव कायम ठेवला आणि लक्ष्य सहज गाठले.

इशान किशनने 28 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. दरम्यान, हेनरिक क्लासेन 47 धावा आणि कामिंदू मेंडिस 32 धावा यांनी संघाला विजय मिळवून दिला. ज्यामुळे हैदराबादने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---