टी-20 क्रिकेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यानंतर फलंदाजीच्या शैलीला पूर्णपणे बदलून टाकले आहे. टी-20 क्रिकेट अस्तित्वात येण्यापूर्वी काही ठरावीक नावे होती. जे फलंदाजी करताना सुरुवातीलाच गोलंदाजांवर वरचढ ठरत होती. परंतु, टी-20 क्रिकेट आल्यामुळे कित्येक अशी कामगिरी करणारे फलंदाज घडले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एका षटकात युवराजने ठोकल्या सर्वाधिक धावा
सध्या भले ही फलंदाज मोठे फटके खेळताना घाबरत नाहीत. परंतु सामन्याची सुरुवात असो, मध्यांतर किंवा शेवटची काही षटके असूद्यात. केव्हाही फलंदाज गोलंदाजांवर वरचढ ठरण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे एकाच षटकात धावांचा पाऊस पाडू शकतात.
मात्र, तरीही एकाच षटकात आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराज सिंगने एकाच षटकात सहा षटकार ठोकत 36 धावा करण्याचा कारनामा केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज हर्षल गिब्जनेही ही कामगिरी केली आहे.
भारतीय देशांतर्गत स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक धावा
युवराज सिंग आणि हर्षल गिब्ज यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक षटकात सर्वाधिक 36 धावा केल्या आहेत. मात्र, सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये ज्यामधे देशांतर्गत क्रिकेटचा ही सहभाग असलेल्या क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंनी सुद्धा अशी कामगिरी केली आहे.
भारतात मागील काही वर्षांपासून स्फोटक फलंदाज पुढे येत आहेत. भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कित्येक खेळाडूंनी एक षटकात धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटमधील असा एक खेळाडू आहे. ज्याने एका षटकात 36 नव्हे, तर 39 धावा झोडपल्या आहेत.
हार्दिक पंड्याने ठोकल्या आहेत एका षटकात सर्वाधिक धावा
भलेही तुम्ही या विक्रमाला ऐकून चकीत झाला असाल. मात्र, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने हा कारनामा केला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका षटकात 39 धावा काढण्याची कमाल केली आहे.
आज हार्दिक पंड्याला जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धुव्वाधार खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्याने भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत एका षटकात सर्वाधिक 39 धावा केल्या आहेत. बडोदा संघाकडून खेळताना हार्दिक पंड्याने दिल्ली संघाविरुद्ध आकाश सूदच्या गोलंदाजीवर 5 षटकार आणि 2 चौकार ठोकत 39 धावा केल्या होत्या. त्यापैकी एक चेंडू नो बॉल होता. हा भारतीय क्रिकेटचा एका षटकातील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार’, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने
“मी, झहीर, हरभजन, सेहवाग, आमच्यापैकी कोणीही विचार केला नव्हता धोनी कर्णधार होईल”
“अश्विन जागतिक किर्तीचा गोलंदाज”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली प्रशंसा