भारताला आज (6 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 23 धावांनी पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारतीय महिला वन-डे संघाची कर्णधार मिताली राजला अंतिम 11 जणींमध्ये स्थान दिले नव्हते.
त्यातच मिताली पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मितालीला मागील वर्षी विंडीजमध्ये झालेल्या महिलांच्या टी20 विश्वचषकामध्ये महत्त्वाच्या सामन्यात खेळवले नव्हते.
याबाबत बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “मितालीला माहित आहे की हरमनप्रीत कौरला 2020मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी संघ तयार करायचा आहे. यामध्ये मिताली खेळणार नाही पण तिला चांगल्या सामन्यातून निवृत्ती द्यायची आहे. त्यासाठी इंग्लंड हाच उत्तम पर्याय आहे.”
मितालीने 85 टी20 सामन्यांत खेळताना 37.42च्या सरासरीने 2283 धावा केल्या आहेत. यात तिने 17 अर्धशतके केली आहेत. नाबाद 97 ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–वन-डे पाठोपाठ टी२०मध्येही सांगली एक्सप्रेस स्म्रीती मंधनाचा धडाका सुरूच…
–भाई-भाई: ‘पंड्या ब्रदर्स’ टीम इंडियाकडून एकत्र खेळणारी तिसरी भावांची जोडी…
–न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर