सध्या भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे बळी गेले आहेत. यूनिसेफ भारताला कोरोनापासून बचावसाठी मदत करत आहेत. यूनिसेफ दुसऱ्या देशामार्फत फंड एकत्र करत आहे. त्यांच्या या मोहिमेत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू देखील सहभागी झाले आहेत. हे सगळे 12 तासाचा गेमिंग लाइव स्ट्रीम मध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज पैट कमिंस याच्या व्यतिरिक्त नॅथन लियोन, मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुड यासारखे खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत.
ही मोहीम वेगवान गोलंदाज जोश लालोर यांच्या पुढाकारमुळे सुरू होणार आहे. हे सगळे खेळाडू या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान क्रिकेट बद्दल बोलणार आहेत. त्यासोबतच खेळाच्या कौशल्याबद्दल ही बोलणार आहेत. या कार्यक्रमा मार्फत 1 लाख डॉलर धनराशी एकत्र करणार आहेत. ही मोहीम 1 वाजून 30 मिनिटानी सुरू होणार आहे. यामध्ये मोइजेस हेनरिक्स, महिला क्रिकेटपटू एलीसा हीली आणि साऊथ आफ्रिकेचा रीली रोसोऊ देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवणार आहे.
याबाबत बोलताना लालोर यांनी सांगितलें की, “ऑस्ट्रेलियाचे खेळाडूंचे भारतासोबत एक वेगळेच नातं आहे. भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती क्रिकेटसाठी वेडा आहे आणि ते परदेशी क्रिकेटपटूंचे मनापासून स्वागत करत. आम्ही सर्वजण मिळून भारतासाठी आर्थिक मदत करू शकलो तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.”
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे नवीन सीईओ निक हॉकली आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग देखील या मध्ये सहभागी आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आतापर्यंत यूनिसेफ ऑस्ट्रेलिया मार्फत भारताला कोरोना संकटात मदतीसाठी 2,80,000 डॉलर एकत्र केले आहेत. यात विविध क्रिकेटपटूंनी वैयक्तिक मदतीद्वारे आपला सहभाग नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या जन्मदिनी एबी बनला गायक, मॅक्सवेलने खेचली टांग
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल
मला बोर्डाचे चेअरमनपद दिले तर मी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही