---Advertisement---

ठरलं तर! अशी असणार 6 टीम्ससाठी प्ले-ॲाफची समीकरणं, मुंबई इंडियन्ससाठी तर…

On: मंगळवार, मे 6, 2025 10:25 AM
---Advertisement---

यंदाचा आयपीएल हंगाम (IPL Season 18) आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे प्ले-ऑफची शर्यत अधिकच रंगतदार झाली आहे. प्ले-ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी आता 17 गुणांची आवश्यकता असून संघांच्या आशा आता उरलेल्या सामन्यांवर अवलंबून आहेत.

सध्याच्या गुणतालिकेनुसार 6 संघ आता 17 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. 3 संघ आयपीएल 2025 मधून बाहेर पडले आहेत. त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK), राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचा समावेश आहे. तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी (LSG) प्ले-ऑफ फेरी गाठणे अधिकच कठीण आहे. कारण संघ 11 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे. अशा परिस्थितीत आपण जाणून घेऊया की कोणते 6 संघ प्ले-ऑफच्या दृष्टीने 17 गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

1) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)- आरसीबी सध्या गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यामुळे उर्वरित 3 सामन्यांपैकी फक्त 1 विजय मिळवला तरी संघ 17 गुणांपर्यंत पोहोचेल.

2) पंजाब किंग्स (PBKS)- पंजाबचा संघ गुणतालिकेत 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यांना देखील 17 गुणांपर्यंत पोहचण्यासाठी 3 सामन्यांत 1 विजय आवश्यक आहे.

3) गुजरात टायटन्स (GT)- गुजरातचा संघ 10 सामन्यात 14 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे 17 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना उर्वरित 4 सामन्यांपैकी 2 विजय मिळवावे लागतील.

4) मुंबई इंडियन्स (MI)- मुंबईचा संघ 11 सामन्यात 14 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, संघाचा नेट-रनरेट (+1.274) सर्व संघांपेक्षा मजबूत आहे. पण संघाला 17 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी 3 सामन्यात 2 विजय आवश्यक आहेत.

5) दिल्ली कॅपिटल्स (DC)- दिल्लीचा संघ गुणतालिकेत 11 सामन्यात 13 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे संघाला 17 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी 3 सामन्यात 2 विजय आवश्यक आहेत.

6) कोलकाता नाईट रायडर्स (KKR)- केकेआरचा संघ 11 सामन्यात 11 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी संघाला उर्वरित तिन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.

17 गुणांपर्यंत पोहोचण्यासाठी संघांना आवश्यक असलेले विजय (प्ले-ऑफसाठी संभाव्य कट-ऑफ)

आरसीबी – 3 सामन्यात 1

पंजाब किंग्स- 3 सामन्यात 1

गुजरात टायटन्स- 4 सामन्यात 2

मुंबई इंडियन्स- 3 सामन्यात 2

दिल्ली कॅपिटल्स- 3 सामन्यात 2

केकेआर – 3 सामन्यात 3

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---