भारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आज न्युझीलँड विरुद्ध खेळताना विक्रमी ६वे शतक केले. जागतिक क्रिकेटमध्ये मिताली राजच्या नावावर आता ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची ही ५५वी वेळ होती.
या शतकी खेळी बरोबर मितालीने विक्रमांना गवसणी घातली. ते विक्रम
#१ भारतीय महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
#२ मितालीने यावर्षी ८१.११ च्या सरासरीने १३ डावात ७३० धावा केल्या आहेत.
#३ मितालीने यावर्षी १० खेळी या ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या केल्या आहेत.
#४ मितालीने यावर्षी १३ डावात ७०*, ६४, ७३*, ५१*, ५४, ६२*, ७१, ४६, ८, ५३, ०, ६९, १०० अशा खेळी केल्या आहेत.
#५ या विश्वचषकात मितालीने ७ डावात ४ अर्धशतकी तर १ शतकी खेळी केली आहे.
#६ मितालीने विक्रमी २३ शतकी भागीदारी रचल्या आहेत.
#७ शतकी खेळी केल्यानंतर मिताली प्रथमच बाद झाली. यापूर्वी मितालीने ५ शतकी खेळी केल्या असून कधीही बाद झाली नाही.
#८ एका वर्षात सर्वाधिक ५०+ खेळी करण्याचा विक्रम आता मितालीच्या नावावर आहे. तिने यावर्षी अशा १० खेळी केल्या आहेत.