---Advertisement---

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

On: रविवार, नोव्हेंबर 18, 2018 11:42 AM
---Advertisement---

गयाना। शनिवारी (17 नोव्हेंबर) आयसीसी महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात आॅस्ट्रेलिया महिला संघावर 48 धावांनी विजय मिळवला.

पण या सामन्यात 11 जणींच्या भारतीय महिला संघात भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे असे पहिल्यांदाच घडले की महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या 11 जणींच्या संघात मितालीचा समावेश करण्यात आलेला नव्हता.

भारताने आत्तापर्यंत या सामन्याआधी 24 सामने महिला टी20 विश्वचषकात खेळले आहेत. या सर्व सामन्यात भारतीय संघाच्या 11 जणींच्या संघात मितालीचा समावेश होता.

मितालीने महिला टी20 विश्वचषकात आत्तापर्यंत 24 सामन्यात 40.33 च्या सरासरीने 726 धावा केल्या आहेत. यात तीने 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

ती महिला टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर या स्पर्धेत ती सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज आहे.

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2018 स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीतील चारही सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा उपांत्य फेरीचा सामना 22 नोव्हेंबरला पार पडेल.

महत्त्वाच्या बातम्या:

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment