Joe Root vs Virat Kohli: जो रूटने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावून इतिहास रचला. या खेळीदरम्यान रूटने अनेक रेकाॅर्ड मोडले. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. याचसोबत तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतके (Most Centuries vs India) झळकावणारा खेळाडू ठरला. रूट पुढेही कसोटी क्रिकेटमध्ये अनेक रेकाॅर्ड मोडेल. पण भारतीय दिग्गज विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये एक असा रेकाॅर्ड आहे, जो रूट कधीही मोडू शकणार नाही. (Joe Root vs Virat Kohli stats)
फलंदाज म्हणून रूट कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीपेक्षा खूप पुढे गेला आहे. परंतु कर्णधार म्हणून तो कोहलीपेक्षा खूप मागे आहे. कर्णधार म्हणून कोहलीने रूटपेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. तसेच, कर्णधार म्हणून फलंदाजीमध्येही कोहली रूटपेक्षा पुढे आहे. हाच एक रेकाॅर्ड आहे, जो रूट कधीही मोडू शकणार नाही. कारण रूटने आता इंग्लंडचे कर्णधारपद सोडले आहे, तर कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
विराट कोहलीने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, ज्यात भारतीय संघ 40 वेळा विजयी ठरला. तर फक्त 17 सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला, तर 11 सामने ड्रॉ राहिले. या काळात कोहलीची विजयाची टक्केवारी जवळपास 59 राहिला आहे. (Virat Kohli Captaincy Record)
कर्णधार म्हणून कोहलीची फलंदाजीमध्येही शानदार कामगिरी राहिली आहे. कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी सामन्यांमध्ये जवळपास 55च्या सरासरीने 5,864 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 20 शतके आणि 7 दुहेरी शतके झळकावली आहेत. (Test cricket batting records)
जो रूटने 64 सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. या दरम्यान त्याने 27 सामने कर्णधार म्हणून जिंकले आहेत. तर 26 सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला आहे, तर 11 सामने ड्रॉ राहिले आहेत. रूटची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी जवळपास 43 टक्के राहिली आहे. (Joe Root Captaincy Record)
कर्णधार म्हणून रूटने जवळपास 47च्या सरासरीने 5,295 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 26 अर्धशतके आणि 14 शतके झळकावली आहेत. कर्णधार म्हणून फलंदाजीमध्येही रूट कोहलीपेक्षा मागेच राहिला आहे. (Joe Root Batting Records)






