---Advertisement---

भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो न्युझीलंंडचा हा खेळाडू , भारताशी आहे जुन नातं

On: रविवार, मार्च 9, 2025 10:55 AM
---Advertisement---

आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणार आहे. दोन्ही संघ दुबईच्या स्टेडियमवर आमने-सामने येतील. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ तब्बल बारा वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकेल? तसेच असं म्हणलं जात आहे की, भारतीय संघाला न्यूझीलंडचा पराभव करणे सोपे जाणार नाही. याआधी साखळी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला होता. आता क्रिकेट जगतातील अनेकांचे म्हणणं आहे की, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

मूळचा भारतीय असलेल्या रचिन रवींद्रने स्पर्धेमध्ये शानदार असं प्रदर्शन केलेलं आहे. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फलंदाजी सोबतच गोलंदाजी मध्येही न्युझीलंडचं काम सोपं केलं आहे. भारतीय संघाला रचिन रवींद्र पासून सावधगिरी बाळगावी लागेल. या स्पर्धेमध्ये त्याने तीन सामन्यात 75.33 च्या ऍव्हरेजने 226 धावा केल्या आहेत. तसेच रचिन रवींद्र सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेन डकेट नंतर दुसऱ्या स्थानी आहे. साऊथ आफ्रिका विरुद्ध उपांत्यफेरी सामन्यात रचिनने शतकी पारी खेळली होती.

रचिन रवींद्रने 32 वनडे सामन्यात न्यूझीलंडच प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने फलंदाज म्हणून 108.73 च्या स्ट्राईक रेटने तसेच 44.3 च्या एव्हरेजने 1196 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 5 शतक तसेच 4 अर्धशतक केली आहेत. त्यामधील त्याचा सर्वोत्तम स्कोर 123 धावा आहेत. याशिवाय रचिनने गोलंदाज म्हणून 5.9 च्या इकॉनोमी आणि 45.2 च्या एव्हरेजने 20 फलंदाजांना बाद केले आहे. असं मानण्यात येत आहे की, भारतीय संघाविरुद्ध आजच्या अंतिम सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर रचिन रवींद्र मोठी कामगिरी करू शकतो.

हेही वाचा

रोहितने 2027 वर्ल्ड कप पर्यंत का खेळायला हवं? जाणून घ्या कारण एका क्लिकवर

चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी संघ सज्ज, न्यूझीलंडला मोठा धक्का बसणार?

गतविजेता आरसीबी संघ डब्ल्यूपीएल स्पर्धेमधून बाहेर, यूपी वॉरियर्सकडून दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---