फलंदाज म्हणून कसोटीत पदार्पण करण्याचा हक्क कॅमेरून ग्रीनने मिळवला आहे, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी दिला आहे. परंतु 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत त्याला अष्टपैलू म्हणून कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. वेगवान गोलंदाजी करण्यास सक्षम असलेला ग्रीन आणि विल पुकोव्स्की त्या पाच नव्या चेहर्यांमध्ये समाविष्ट आहेत, ज्यांना भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
जस्टीन लँगर यांनी म्हटले आहे की, “वनडे क्रिकेटमध्ये तो तेव्हाच खेळू शकेल, जेव्हा तो काही षटके गोलंदाजी करू शकतो. कारण आम्ही अशाच प्रकारे संघ तयार केला आहे. त्याला मर्यादित षटकांचा अनुभव नाही. परंतु गोलंदाजी करताना जर तो काही षटके फेकत असेल, तर तो चांगला पर्याय बनू शकतो.”
“कसोटी क्रिकेट वेगळे आहे. त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा हक्क मिळविला आहे. मला त्याची फलंदाजी बघायला आवडते. तो एक उंच फलंदाज आहे आणि त्याच्याकडे शॉट्स खेळण्यासाठी खूप वेळ असतो,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
भारताविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबरपासून एडलेड येथे डे-नाईट स्वरूपात सुरू होईल. ग्रेग चॅपलसारख्या दिग्गजांवर ग्रीनचा जोरदार प्रभाव आहे. हा 21 वर्षीय फलंदाज रिकी पाँटिंगनंतर पाहिला गेलेला सर्वोत्तम फलंदाज आहे, असे चॅपल यांचे मत आहे.
ग्रीन म्हणाला की, त्याला खेळण्याची संधी मिळो अथवा ना मिळो. परंतु त्याच्या पदार्पण मालिकेतून त्याला बरेच काही शिकण्यासाठी मिळेल. तो म्हणाला, “चार दिवसांच्या क्रिकेटमध्ये मी टी -20 पेक्षा निश्चितच चांगले निकाल मिळवले आहेत. जरी मी खेळलो नाही तरीही मला बराच अनुभव मिळेल आणि त्याचा फायदा मला होईल, अशी आशा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सोपी खेळपट्टी मिळणार? पाहा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू काय म्हणतोय
… तर आम्ही विराटच्या मुलाला ऑस्ट्रेलियन म्हटले असते – ऍलन बॉर्डर
मेलबर्न कसोटीपूर्वी आयोजक चिंतेत; खेळपट्टीचे नाही करता येणार परीक्षण