ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारताचा संघ कधी एकदा जाहीर होतो याची खेळाडूच काय चाहतेही चातकासारखी वाट पाहत होते. एकदाची सोमवारी (12 सप्टेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटरवर 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली. रोहित शर्मा या स्पर्धेत नेतृत्व करणार आहे तर केएल राहुल उपकर्णधार आहे. या संघामध्ये अनेक जुने चेहरे आहेत, तर काहींचा हा पहिलाच टी20 विश्वचषक असणार आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये भारताच्या एका खेळाडूने त्याच्या वेगाने आणि विकेट घेण्याच्या कौशल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तो प्रथमच विश्वचषकात भारताच्या वरिष्ठ संघाकडून खेळणार आहे. हर्षल पटेल (Harshal Patel) त्याचे नाव.
हर्षलला 2005 साली त्याच्या कुटुंबासोबत अमेरिकेला स्थायिक होण्याची संधी होती, मात्र त्याने फक्त क्रिकेटसाठी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्याचा भाऊ तपन पटेलने मोलाची भूमिका बजावली. नंतर तो स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उंचावत राहिला. त्याने 2008-09च्या विनू मंकड ट्रॉफीमध्ये 23 विकेट्स घेत लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे तो 2010मध्ये भारताच्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा भागही होता. त्याच वर्षी त्याला मुंबई इंडियन्सने संघात घेतले.
हर्षलच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. यादरम्यान त्याला गुजरात संघातूनही वगळण्यात आले, परंतु त्याने हिंमत सोडली नाही आणि हरियाणासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने 2011-12 च्या हंगामात 28 बळी घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
या 31 वर्षीय खेळाडूने 2012मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाल्याने त्याला कमी संधी मिळाल्या. त्याचा आयपीएलमधील फॉर्म हरपत चालला असताना तो रणजी ट्रॉफीमध्ये मात्र उल्लेखनीय कामगिरी करतच राहिला. त्याने 2019-20च्या रणजी हंगामात 9 सामन्यात 52 विकेट्स घेत जोरदार पुनरागमन केले.
One title 🏆
One goal 🎯
Our squad 💪🏻#TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/Dw9fWinHYQ— BCCI (@BCCI) September 12, 2022
हर्षलला 2021मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लिलावामध्ये 10.75 कोटी रूपयांना संघात घेतले. त्यानेही संघव्यवस्थापक आणि कर्णधाराचा विश्वास राखत त्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपला हक्क दाखवला. त्याने ड्वेन ब्रावोच्या 32 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याची हीच कामगिरी त्याला भारतीय संघात निवड होण्यासाठी महत्वाची ठरली.
हर्षलने टी20 विश्वचषक 2021नंतर भारतीय संघात पदार्पण केले. त्याने घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या 2 टी20 सामन्यात चांगली कामगिरी केली. त्याने पहिल्याच सामन्यात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने ज्या दोन्ही खेळाडूंना आपली शिकार बनवले त्यात सलामीवीर डॅरिल मिशेल आणि मधल्या फळीतील ग्लेन फिलिप्सचे नाव होते. पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल पटेलला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
हर्षल हा दुखापतीमुळे आशिया चषक 2022स्पर्धेस मुकला होता. मात्र त्याने दुखापतीतून पूर्णपणे बरे होत फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्याने भारताकडून आतापर्यंत 17 टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकांसाठीही संघात जागा मिळाली आहे.
टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलाला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद. शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या तिघांची वर्ल्डकपसाठी निवड झाली खरी, पण बीसीसीआयने ठेवलीये अट; वाचा सविस्तर
विराटच्या 5 लाडल्यांचा रोहितच्या टीम इंडियातून पत्ता कट! पाहा कोण आहेत ते
नाद केला! गेल्यावर्षी ढसाढसा रडलेल्या चहलने यावर्षी वर्ल्डकपसाठी टीम इंडियात जागा मिळवलीच