---Advertisement---

…आणि टीम इंडियाविरुद्ध एकही चेंडू खेळण्याआधीच तो फलंदाज झाला बाद

---Advertisement---

आज (28 जानेवारी) पोशेफ्स्ट्रूम ( Potchefstroom), दक्षिण आफ्रिका (South Africa) येथे 19 वर्षाखालील विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना जेक फ्रेजर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) हा खेळाडू एकही चेंडू न खेळता शून्यावर बाद झाला आहे.

या सामन्यात भारताच्या 234 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेजर हा खेळाडू शून्यावर धावबाद झाला.

झाले असे की, सलामीवीर सॅम फॅनिंग (Sam Fanning) फलंदाजी करत होता आणि जेक फ्रेजर नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. त्यावेळी भारताकडून कार्तिक त्यागी (Kartik Tyagi) पहिल्या षटकात गोलंदाजी करत होता. कार्तिकच्या पहिल्याच चेंडूवर सॅमने चेंडू फटकावला आणि पहिली धाव घेण्यासाठी जेक फ्रेजरला कॉल दिला.

यावेळी जेक फ्रेजर धाव घेण्यासाठी तयार नव्हता पण सॅमने कॉल दिल्याने तो धावला. याचवेळी दिव्यांश सक्सेनाने (Divyaansh Saxsena) चेंडू आडवत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे चेंडू फेकला. त्यावेळी जुरेलने कोणतीही चूक न करता स्टंम्पसवरील बेल्स उडवत जेक फ्रेजरला धावबाद केले. त्यामुळे फ्रेजरला एकही चेंडू न खेळता पव्हेलियनमध्ये जावे लागले.

तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 बाद 233 धावा केल्या. यामध्ये भारताकडून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 82 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. तर अथर्व अंकोलेकरने (Atharva Ankolekar) नाबाद 55 धावांची खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---