विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक विशेष ट्रेंड सुरू झाला आहे. संघाच्या सामन्यानंतर, ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत, सामन्यादरम्यान सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूची ‘फिल्डर ऑफ द मॅच’ म्हणून निवड केली जाते आणि त्याला पदक देऊन गौरविण्यात येते. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतरही हा ट्रेंड दिसून आला आणि यावेळी यष्टीरक्षक केएल राहुलने बाजी मारली.
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने केएल राहुल () याला पदक प्रदान केले. यावेळी सर्व भारतीय खेळाडू खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसले आणि मोठ-मोठ्याने जल्लोषही करत होते. बीसीसीआयने या संपूर्ण सोहळ्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकोउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप (T Dilip) यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. क्षेत्ररक्षणाचा उल्लेख करत त्यांनी गोलंदाजीत मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांचं विशेष अभिनंदन केले.
यानंतर, दिलीप यांनी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचे सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील त्याची चपळता आणि अचूकतेबद्दल त्याचे कौतुकही केले. दिलीपने यष्टीरक्षकाबद्दल बोलताना भारतीय यष्टीरक्षक केएल राहुलचे कौतुक केले आणि सामन्यामध्ये त्याला आलेल्या अडचणींबद्दल सांगितले. त्याचवेळी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) क्षेत्ररक्षणावेळी केलेल्या त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
शेवटी, टीव्हीवर विजेत्याची घोषणा करण्यात आली आणि केएल राहुलने केलेल्या यष्टीरक्षणाची क्लिप दाखवण्यात आली. ती क्लिप पाहून विराट कोहलीसह इतर खेळाडूंनी खूप जल्लोष केला. ‘फिल्डर ऑफ द मॅच’चे पदक राहुलला शार्दुल ठाकूरने प्रदान केले. इतर सर्व खेळाडू या कार्यक्रमाचा आनंद घेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
शनिवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात भारताने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकात सर्वबाद 191 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग भारतीय संघाने अवघ्या 30.3 षटकात केला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावा केल्या. (This player was the best fielder in India vs Pakistan match BCCI shared funny video)
महत्वाच्या बातम्या –
‘हा तर फुसका बॉम्ब, मोठ्या पोरांनी…’, भारताच्या विजयानंतर सेहवागची लक्षवेधी पोस्ट
सचिन ते बुमराह, विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हिरो बनलेले 6 धुरंधर, एक तर तीनदा चमकला