कोलंबो: भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा विश्वास आहे की विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याचा संघ गेल्या काही वर्षांतील संघांपेक्षा अधिक चांगली करत आहे.
“हा भारतीय संघ दोन वर्षांपासून एकत्र आहे आणि आता हा संघ अधिक अनुभवी झाला आहे. संघाने अशा बर्याच कामगिऱ्या केल्या आहेत ज्या मागील इतर अनेक भारतीय संघांना जमू शकलेल्या नाहीत, उदाहरणार्थ, श्रीलंकेत २०१५ मध्ये जिंकणे.” असे शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०१५ मध्ये जेव्हा कोहलीच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती, भारताने याआधी २२ वर्षात श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली नव्हती. मोहम्मद अझरुद्दीनच्या टीमने १९९३ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती.
शास्त्री यांनी गेल्या दोन दशकांमधील अनुभववी खेळाडूंवरही टिपणी केली.
“मोठ्या भारतीय खेळाडूंना २० वर्षां खेळूनही श्रीलंकेत अनेकदा येऊनही, त्यांनी कधीही येथे मालिका जिंकलेली नाही. या संघाने हे करून दाखवले आहे. भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि तेही परदेशात, “असे ते म्हणाले.
तथापि, शास्त्रीचे निरीक्षण थोडे चुकत आहे, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००७ मध्ये कसोटी मालिकेत पूर्ण ताकदीनिशी भारताला इंग्लंड विरुद्ध १-० असा विजय मिळवून दिला होता.
त्यापूर्वी सौरव गांगुलीच्या टीमने २००४ साली ऑस्ट्रेलियात १-१ अशी बरोबरी केली होती आणि २००२ मध्ये नासीर हुसेनच्या इंग्लंड संघाविरुद्ध १-१ अशी बरोबरी केली होती.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वखाली संघाने २००९ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध मालिका जिंकली (१-०) आणि २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (१-१) बरोबरी केली होती.