आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये अजून हे पक्के झाले नाही की, कोणते 4 संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील? पण दोन संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडले आहेत. आधी चेन्नई सुपर किंग्स नंतर राजस्थान रॉयल्स संघ सुद्धा या रेस मधून बाहेर झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला 100 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा त्यांचा हंगामातील 11 सामन्यांमधील 6 वा पराभव होता. राजस्थानच्या पराभवाचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे, मुख्य खेळाडूंनी चांगले प्रदर्शन न करणे. यामध्ये शिमरॉन हेटमायरचे देखील नाव सामील आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2025 मेगा लिलावाआधी जेव्हा रिटेन खेळाडूंची लिस्ट घोषित केली, तेव्हा त्यामध्ये वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायरला देखील रिटेन केले होते. ज्यासाठी राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्यांनी त्याला संघात रिटर्न करण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च केले होते.
संघाला आशा होती की, हेटमायर या हंगामात शानदार प्रदर्शन करेल पण त्याने सर्वांना निराश केले. संघ प्लेऑफ मधून बाहेर पडला त्याचे मुख्य मोठे कारण म्हणजे, त्याचे खराब प्रदर्शन देखील आहे. या हंगामात 11 सामने खेळले ज्यामध्ये त्याला 10 वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती पण, त्याने यादरम्यान 20.78 च्या सरासरीने केवळ 187 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये फक्त एकच अर्धशतक सामील आहे.
आयपीएल 2025 मध्ये शिमरॉन हेटमायरने फिनिशरच्या भूमिकेत सर्वांनाच पूर्णपणे नाराज केले. राजस्थान रॉयल्सने त्याला आतापर्यंत 11 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी दिली होती, पण त्याने योग्यरित्या त्यामध्ये फलंदाजी केली नाही. या कारणाने राजस्थान रॉयल्सने काही सामने खूप थोड्या फरकाने गमावले. ज्यांमध्ये एका वेळी त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, तेव्हाच त्यांनी सामने गमावले. आता हे पाहणे महत्त्वाचे असेल की, आयपीएलच्या पुढच्या हंगामात राजस्थान संघ हेटमायरला संघात ठेवेल की रिलीज करेल.