भारतीय संघ सध्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. मालिकेतील पहीला सामना नाॅटिंघमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळला गेला. पहिला सामना पावसामूळे अनिर्णीत करण्यात राहिला. पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांंचे प्रदर्शन पाहण्याजोगे होते. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी इंग्लंडला 183 धावांवर सर्वबाद करून तंबूत पाठवले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज बुमराहाने 5 विकेट्स घेत विरोधी संघाला 303 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघाला अंतिम दिवशी विजयासाठी केवळ 157 धावांची अवश्यकता होती. मात्र, पावसामुळे शेवटच्या दिवशीचा खेळ रद्द करावा लागला.
आता मालिकेतील दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी तयारी करत आहेत. दुसरा सामना 12 ऑगस्टपासून लाॅड्सवर खेळला जाणार आहे. लाॅड्सचे मैदान अनेक बाबतीत ऐतिहासिक आहे. त्याला ‘क्रिकेटची पंढरी’ असेही म्हटले जाते. या मैदानावर खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आजवर भारतीय संघासाठी लाॅड्सचे मैदान फार काही यशदायी ठरले नाही. मात्र, काही भारतीय गोलंदाज आहेत, ज्यांनी लाॅड्सवर चांगली गोलंदाजी केली आहे. या तीन गोलंदाजांनी कसोटी सामन्यांत इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी सर्वाधीक विकेट्स मिळवल्या आहेत.
तीन भारतीय गोलंदाज ज्यांनी इंग्लंडविरूद्ध लाॅड्सवर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधीक विकेट्स घेतल्या
3. इशांत शर्मा (12 विकेट)
इशांत शर्मा सध्या स्थितीला भारताचा सर्वात जास्त अनुभवी गोलंदाज आहे. इशांत मागच्या अनेक सामन्यांंमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इशांत खेळू शकला नाही. मात्र, दुसऱ्या कसाटी सामन्यात खेळण्याची त्याची इच्छा असणार आहे. जर इंग्लंडविरुद्धच्या लाॅड्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यांचा विचार केला तर, इशांतने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याच सर्वोत्तम प्रदर्शनात त्याने 74 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या.
2. कपिल देव (17 विकेट)
कपिल देव आणि लाॅड्सच्या मैदानाचे नाते खूप मजबूत आहे. भारताने त्याचा पहिला विश्वचषक याच मैदानावर आणि कपिल देवच्याच नेतृत्वाखाली जिंकला होता. कपिल देवने अनेकदा त्याच्या अष्टपैलू खेळीने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. क्रिकेट विश्वात त्याची एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून आठवण काढली जाते. कसोटीत कपिल देव उत्तम गोलंदाज होता, त्याने त्याचे चांगले प्रदर्शन लाॅड्सच्या मैदानावरही कायम राखले होते. कपिल देवने इंग्लंडच्या विरोधात लाॅड्सवर 4 कसोटी सामन्यांत 17 विकेट्स घेत 32.52 सरासरी राखली होती. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शनात 125 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
1. बिशन सिंग बेदी (17 विकेट)
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडचे मैदान वेगवान गोलंदाजांसाठी लाभदायी ठरत असतात. असे असले तरी मैदानावर सर्वाधीक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत फिरकी गोलंदाजीचे नाव येते. ही गोष्ट दाखवते की गोलंदाजाचा दर्जा किती वरचा आहे. त्याने त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत 4 वेळा लाॅड्सवर सामने खेळले, ज्यात त्याने 17 विकेट्स घेत 28.94 ची सरासरी राखली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाप असावा तर असा! शतक झाल्यानंतर रॉस टेलर मुलीसाठी करतो ‘ही’ गोष्ट; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान