दिनांक १८ ते २२ जून दरम्यान साउथम्प्टनच्या मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु अनेक अशीही काही कारणे आहेत, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
भारतीय संघाने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत आयसीसीच्या नॉकआऊट (बाद फेरी) सामन्यात प्रवेश केला आहे. परंतु त्यांना जेतेपद पटकावता आले नाहीये. यामागील प्रमुख कारण पंच रिचर्ड केटलब्रॉ हे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. रिचर्ड केटलब्रॉ यांनी भारतीय संघाच्या अनेक नॉकआऊट सामन्यात पंचगिरी केली आहे. ज्यामध्ये भारतीय संघाला अखेरच्या क्षणी विजय मिळवण्यात अपयश आले आहे.
दुर्दैवाने हेच पंच कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात मैदानी पंचाच्या भूमिकेत असणार आहेत.
अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये करावा लागला पराभवाचा सामना
साल २०१४ पासून जेव्हा जेव्हा भारतीय संघाने आयसीसीच्या विश्वस्तरीय स्पर्धांचे नॉकआऊट सामने खेळले आहेत, तेव्हा तेव्हा रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. भारतीय संघाने २०१४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने त्यांना पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. या सामन्यात देखील रिचर्ड केटलब्रॉ हे पंच होते. त्यांनतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वनडे विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यातही भारताचा पराभव झाला होता.
इतकेच नव्हे तर रिचर्ड केटलब्रॉ हे पंच असताना भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध २०१६ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात, पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या २०१९ विश्वचषक उपांत्य फेरी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सर्व महत्त्वांच्या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघासाठी पंच रिचर्ड केटलब्रॉ दुर्दैवी ठरले आहेत.
याखेरीज रिचर्ड केटलब्रॉ पंच असलेल्या दर कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. अशातच रिचर्ड केटलब्रॉ हे या महत्त्वाच्या सामन्यात पंच असल्याने कोट्यावधी भारतीय चाहत्यांचे पुन्हा एकदा मन तुटू शकते.
https://twitter.com/DevVermaByt/status/1396997856976719880?s=20
परंतु दुसरीकडे रिचर्ड केटलब्रॉ यांच्याबरोबर असलेले दुसरे मैदानी पंच मिचेल घो यांच्यासोबतची भारतीय संघाची आकडेवारी अतिशय चांगली आहे. मिचेल पंच असताना भारतीय संघाने एकाही कसोटी सामन्यात पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. त्यामुळे पंच मिचेल भारतीय संघासाठी सकारात्मक बाब ठरू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे
‘भारत सर्वश्रेष्ठ संघ, आम्हाला विजयाचा दावेदार म्हणू नका,’ केन विलियम्सनची प्रामाणिक कबुली
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा, १९४ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचे निधन