शनिवारी (20 जानेवारी) शोएब मलिका आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत राहिल्या. शोएबने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून तिसऱ्या लग्नाची माहिती सर्वांना दिली. पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री सना जावेद त्याची नवी नवरी बनली. अशातच भारताचा महान टेनिसपटू सानिया मिर्झा हिचे वडील इम्रान मिर्झा यांच्याकडून महत्वाची माहिती समोर येत आहे.
सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक एप्रिल 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. मागची 13 वर्ष या दोघांनी पती पत्नीच्या रुपात एकत्र घालवली. पण शनिवारी (20 जानेवारी) अशेर त्यांच्यातील नाते तुटले. शोएब आणि सना जावेद यांच्या सोशल मीडिया खात्यावरून लग्नाचे फोटो पोस्ट झाल्यानंतर याची पुष्टी झाली. शोएब मलिकचे हे तिसरे लग्न असून जवळच्या लोकांकडून दोघांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी, घटस्फोटासाठी दोघांपैकी नक्की कोणाचा आग्रह होता, याविषयी चाहत्यांना माजून घ्यायचे आहे. याच पार्श्वभूमीवर सानियाचे वडील इम्रान मिर्झा (Imran Mirza) यांनी महत्वाची माहिती दिली.
View this post on Instagram
माध्यमांतील वृत्तांनुसार इम्रान मिर्झा यांनी सनियाला शोएबकडून घटस्फोट मिळाल्याच्या बातम्या चुकीच्या ठरवल्या. इम्रान म्हणाले की, “हा घटस्फोट नव्हता, ‘खुला’ होता.” म्हणजेच शोएबने घटस्फोट घेतला नव्हता, तर सानियाकडून त्यात्यासोबतचे नाते तोडण्यात आले. इस्लाम धर्मात महिलांना हक्क दिला गेला आहे की, त्या आपल्या पतीला घटस्फोट मागू शकतात. याला ‘खुला’ असे म्हटले जाते. म्हणजेच जेव्हा घटस्फोट पतीकडून दिला जात नाही, पण पत्नीकडून दिला जातो, त्यालाच ‘खुला’ असे म्हणले जाते.
View this post on Instagram
दरम्यान, शोएबने नव्या संसाराला सुरुवात केली असली, तर सानियासोबत त्याला आपले नाते पूर्णपणे संपवता येणार नाही. कारण सानिया आणि शोएबला इजहान नावाचा मुलगा आहे. 2018 मध्ये हे दोघेजण आई-वडील बनले होते. माध्यमांतील वृत्तानुसार सानिया आणि शोएबच्या घटस्फोटानंतर इजहान दुबईत राहील आणि त्याच्या संगोपनावर होणारा खर्च या दोघांकडून दिला जाईल. (This was not divorce, it was ‘Khula’ said Sania Mirza’s father)
महत्वाच्या बातम्या –
शोएब मलिकच्या सख्या बहिणीचा मोठा खुलासा, ‘त्याची खूप लफडी होती’
Sania Mirza । शोएब मलिकने केलं तिसरं लग्न, दुसरी पत्नी सानिया मिर्झा म्हणाली….






