चेम्सफोर्ड | २५ ते २७ जुलै या दरम्यान कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना पार पडला.
या सामन्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या एका क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Kaise na ho gujara.. jab saath ho Kohli aur Pujara! pic.twitter.com/7SXrm8kShf
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 27, 2018
“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा.” असे कॅप्शन देत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनेने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.
शिखर धवनच्या या ट्विटला “ना हो कोई फिकर, जब बीच मैं हो शिखर” असे रिट्विट करत भारताचा भरोशाचा फलंदाज चेतेशवर पुजाराने आपणही शायरी करण्यात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
Na ho koi fikar, jab humaare beech mein ho Shikhar! 😜 @SDhawan25 https://t.co/gXhHaaHMD0
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) July 27, 2018
या सराव सामन्यात शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांचीही कामगिरी निराशाजनक झाली होती.
मात्र आपल्या मनमौजी स्वभावसाठी प्रसिद्ध असलेल्या शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांच्या ट्विटरवरील संभाषणाने असंख्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-तडाखेबंद खेळी करत स्म्रीती मानधनाने केली विश्वविक्रमाची बरोबरी
-गांगुलीला मागे टाकत कॅप्टन कोहली होणार नवा ‘दादा’?