पुणे, 18 फेब्रुवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत साखळी फेरीत थॉर, ब्लॅक पँथर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदु जिमखाना येथील कॅरम हॉल मध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत अ गटात पराग चोपडा, केदार तळवळकर, समीर वर्तक, रोहन पै यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर थॉर संघाने आर्यनमॅन संघाचा 3-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. ब गटात ब्लॅक पँथर्स संघाने कॅप्टन अमेरिका संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघाकडून भार्गव आठवले, योगेश लोहिया, कौस्तुभ देशपांडे, संजय बामणे आदित्य पावनगडकर, रेवती पैठणकर यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात ब्लॅक पँथर्स संघाने वूल्वरीन संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले.
याआधी स्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या कॅरम विभागाचे सचिव शिरीष साठे, बॅडमिंटन विभागाचे सचिव तन्मय आगाशे, दिपक गाडगीळ, अभय राजगुरू, संजय बामणे, राहुल मुंदडा, दिपेश अभ्यंकर, क्लबचे सरव्यवस्थापक मनीष चौबळ, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट अ: थॉर वि.वि.आर्यनमॅन 3-1 (एकेरी: पराग चोपडा वि.वि.राहुल मुंदडा 22-09; दुहेरी: केदार तळवळकर/समीर वर्तक वि.वि.विकास रुकारी/अमोद प्रधान 29-06; एकेरी: रोहन पै वि.वि.अमित मदन 29-00; दुहेरी: डॉ. शहा/भाग्यश्री देशपांडे पराभूत वि.देबक/विनीत रुकारी 00-29)
गट ब: ब्लॅक पँथर्स बरोबरी वि.वूल्वरीन 2-2(एकेरी: संजय बामणे वि.वि.आनंद केसकर 24-15; दुहेरी: योगेश लोहिया/आदित्य पावनगडकर पराभूत वि.बाळ कुलकर्णी/संदीप बावडेकर 23-24; एकेरी: किर्ती श्रॉफ पराभूत वि.अद्वैत जोशी 00-29; दुहेरी: कौस्तुभ देशपांडे/रेवती पैठणकर वि.वि.गिरीश मुजुमदार/जयकांत वैद्य 27-12);
गट ब: ब्लॅक पँथर्स वि.वि.कॅप्टन अमेरिका 4-0(एकेरी: भार्गव आठवले वि.वि.अभय राजगुरू 28-08; दुहेरी: योगेश लोहिया/कौस्तुभ देशपांडे वि.वि.आदिती राजगुरू/अमृता देवगावकर 29-06; एकेरी: संजय बामणे वि.वि.मंदार देवगावकर 28-14; दुहेरी: आदित्य पावनगडकर/रेवती पैठणकर वि.वि.अभिजीत शहा/कविता पांडे 26-23).
(Thor, Black Panthers team’s winning debut in the 3rd PYC Carrom League 2023 tournament)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनच्या या कृत्यामुळे मोठमोठ्याने हसू लागला विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रिएक्शनही पाहण्यासारखी
तिसऱ्या-चौथ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियासाठी विजय कठीण! प्रमुख खेळाडूची मालिकेतून माघार