क्रिकेट इतिहासात असे अनेक सामने झाले आहेत. जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही प्रकारात क्रिकेटचा थरार पाहण्यास मिळतो. 100 पेक्षाही अधिक वर्षांचा क्रिकेटला इतिहास आहे. या वर्षांमध्ये अनेक बदल क्रिकेटमध्ये होत गेले. अनेक मोठ्या स्पर्धा सुरु झाल्या. त्यातीलच एक स्पर्धा म्हणजे विश्वचषक.
गेल्या ५ दशकापासून विश्वचषक स्पर्धा होत आहेत. यामध्ये अनेक अविस्मरणीय सामने झाले. जर साल 1974 पासून आजपर्यंत झालेल्या विश्वचषकाचा विचार केला, तर पाच असे सामने आहेत, जे चटकन डोळ्यांसमोर उभे राहतात, जे चाहत्यांच्या कायम आठवणीत आहेत. त्या पाच सामन्यांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
चाहत्यांच्या नेहमी आठवणीत राहणारे 5 विश्वचषकातील सामने- Those 5 Matches of World Cup History which stopped the Audience Till the End
1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (1999)
साल 1999 च्या विश्वचषकातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला सामना म्हणजेच दुसरा उपांत्यफेरी सामना. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia and South Africa) यांच्यात बर्मिंगहम येथे झाला होता. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 49.2 षटकांत 213 धावांवर रोखले होते. आफ्रिकेला वाटलं, की सामना आपण सहज जिंकू. परंतु, शेन वॉर्नच्या जादुई गोलंदाजीने सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. वॉर्नने त्या सामन्यात 10 षटकांत 29 धावांच्या बदल्यात 4 विकेट घेतल्या. गोलंदाजांनी एका पाठोपाठ एक विकेट घेत आफ्रिकेला 213 धावांवर रोखलं आणि सामना बरोबरीत सुटला. पण रनरेट नुसार ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहचली.
2. दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (2007)
साल 2007 च्या विश्वचषकात सुपर- 8 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका (South Africa and Sri Lanka) यांच्यात सर्वात रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा वरची फळी स्वस्तात पव्हेलियनमध्ये परतली. तसेच संपूर्ण संघ 209 धावात आटोपला. त्यामध्ये तिलकरत्ने दिलशानने सर्वाधिक 58 धावा, तर रसेल अर्नोल्डने 50 धावा केल्या. विजयासाठी हे लक्ष्य सोपे होते.
जॅक कॅलिसच्या 86 आणि हर्शेल गिब्सच्या 31 धावांच्या खेळीने आफ्रिकेचा विजय निश्चित केला होता. परंतु अचानक त्यांच्या विकेट पडत गेल्या आणि 206 धावांत 4 बाद अशी अवस्था झाली. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती, नंतर 3 धावांत पाच विकेट गेल्या आणि सामन्याचं रूप बदललं.पण रॉबिन पीटरसनच्या चौकारामुळे आफ्रिकेचा विजय झाला.
3. भारत विरुद्ध इंग्लंड (2011)
साल 2011च्या विश्वचषकावर भारतानं आपलं नाव कोरलं होतं. पण यामध्ये असा एक सामना झाला ज्याने चाहत्यांचा श्वास रोखून ठेवला होता. ग्रुप बीमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात एक सामना 27 फेब्रुवारीला चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 338 धावांचं लक्ष इंग्लंड समोर ठेवलं होतं. यात सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) 120 धावा केल्या होत्या. भारताकडे चांगले गोलंदाज होते, त्यामुळे विजय सहज मिळेल असं वाटलं. पण इंग्लंडच्या सलामी अँड्र्यू स्ट्राॅसच्या विस्फोटक फलंदाजीने सर्वांची झोप उडाली.
पाहता पाहता इंग्लंड विजयाजवळ पोहोचला. शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 14 धावांची गरज होती. त्या षटकात झहीर खानने 13 धावा दिल्या आणि सामना बरोबरीत सुटला. स्ट्राॅसने या सामन्यात 18 चौकर आणि 1 षटकार मारत 158 धाव केल्या.पण मधल्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी गेले.
4. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
कमी धावांचा सामना कायम हा रोमांचक असतो. 2011 च्या विश्वचषकातील 21व्या सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (England vs South Africa) आमने-सामने होते. चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय आफ्रिकन गोलंदाजांनी चुकीचा ठरवत, इंग्लंडला 171 धावांत रोखलं. पण जेव्हा सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकन फलंदाज आले. तेव्हा त्यांची परिस्थिती इंग्लंडच्या फलंदाजांसारखी झाली. कधी एका संघाचं पारडं भारी वाटायचं तर कधी दुसऱ्या. शेवटी इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले, आणि आफ्रिकेला 165 धावांवर रोखून 6 धावांनी विजय मिळविला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्राॅडने 15 धावांत 6 विकेट घेतल्या.
5. न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया (2015)
विश्वचषक 2015 मधील 20वा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (New Zealand and Australia) यांच्यात झाला होता. चाहत्यांच्या श्वास रोखून ठेवणारा हा सामना 28 फेब्रुवारीला ऑकलँडमध्ये खेळला गेला. या सामन्यात कोण बाजी मारणार हे शेवट पर्यंत कोणीच ठरवू शकत नव्हतं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 151 धावा केल्या. विजयाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामी जोडीने 40 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडचा विजय पक्का मानला गेला. पण मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीने सामन्याचं चित्रच पालटलं. स्टार्कने सामन्यात 28 धावा देत 6 विकेट घेतल्या. 146 धावांवर न्यूझीलंडच्या 9 विकेट गेल्या होत्या. पण केन विलियम्सनच्या (Kane Williamson) नाबाद 45 धावांमुळे हा सामना शेवटी न्यूझीलंडने जिंकला. न्यूझीलंड कडून ट्रेंट बोल्टने (Trent Boult) 5 विकेट घेतल्या होत्या.
वाचनीय लेख-
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान झालेले ५ खेळाडू
-एकाच दिवसात बनलेले आणि मोडलेले क्रिकेट इतिहासातील ४ विक्रम, एक तर मोडला केवळ १४ मिनीटात
-वनडे सामन्यात ‘या’ ५ भारतीय गोलंदाजांची झाली आहे चांगलीच धुलाई