कोविड-१९ मुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. यानंतर क्रिकेटप्रेमींना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून या कालावधीत साउथम्पटन येथील द रोज बाउल येथे हा सामना रंगणार आहे.
या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात काही गोलंदाजांच्या प्रदर्शनावर सर्वांचेच लागून असणार आहे. या गोलंदाजांनी आयसीसीच्या कसोटी क्रमवारी टॉप-१० मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातही त्यांच्या खतरनाक गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळणार आहे. चला तर बघूयात आहेत ते गोलंदाज?
आर अश्विन- भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मालिकावीर पुरस्कार जिंकला होता. या मालिकेत ४ सामने खेळताना त्याने तब्बल ३२ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान ३ वेळा त्याने एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्याच्या या योगदानामुळे भारताने ३-१ ने कसोटी मालिकेत बाजी मारली होती. याबरोबरच अश्विनने कसोटी क्रमवारीतही ८५० गुणांसह दुसऱ्या स्थानी ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
नील वॅगनर- न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनर याला कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते. या ३५ वर्षीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत ५१ कसोटी सामने खेळताना तब्बल २१९ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान ९ वेळा त्याने एका सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्सची कामगिरी केली आहे. ८२५ गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या वॅगनरने भारताविरुद्ध एक कसोटी सामना खेळताना ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो भारतीय गोलंदाजांपुढे अडचणी निर्माण करु शकतो.
टीम साउदी- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउथी हादेखील आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये आहे. त्याला आतापर्यंत ७७ कसोटी सामन्यांचा अनुभव असून त्याने ३०२ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे. याबरोबरच ११ वेळा फाइव्ह विकेट हॉल आणि १ वेळा टेन विकेट हॉल नोंदवला आहे. तसे तर, साउदीने भारताविरुद्ध २० कसोटी सामने खेळताना अवघ्या १२ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात तो आपल्या कामगिरीला सुधारण्याच्या प्रयत्नात असेल. यामुळे भारतीय फलंदाज त्याच्याविरुद्ध संघर्ष करताना दिसू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्या’मुळेच सीएसके संघ यंदा आयपीएलमध्ये टिकून राहू शकला, पाहा दिग्गजाने कोणाची केली स्तुती
बलाढ्य मुंबई इंडियन्सला मिळणार ‘या’ धुरंधरांची साथ, मिड सिजनमध्ये होऊ शकतात ताफ्यात दाखल