क्रिकेटमध्ये २६ डिसेंबरला एक वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी जवळपास गेले ४० वर्षे नियमितपणे कसोटी सामने होत असतात. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना प्रसिद्ध आहे. गेल्या ४० वर्षात ३९ बॉक्सिंग डे कसोटी सामने मेलबर्नमध्ये झाले आहेत.
दरवर्षी २६ डिसेंबरला होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणतात. या दिवशी ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका देशातही बऱ्याचदा कसोटी सामने होत असतात. यंदा देखील या तिन्ही देशात बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवले जाणार आहे. त्यामुळे ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सालाबादप्रमाणे यंदाही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होईल. हा सामना या दोन उभय संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरुवात होईल. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. कसोटी मालिकेत सध्या पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान –
शनिवारपासून (२६ डिसेंबर) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. हा सामना माउंट मोंगनूईच्या बे ओव्हल स्टेडियमवर होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३.३० वाजता सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका –
यंदा तिसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळवला जाईल. या सामन्याने या दोन देशांतील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंच्यूरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरुवात होणार आहे.
चाहत्यांसाठी पर्वणी –
न्यूझीलंड – पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया – भारत हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटेच सुरु होणार आहेत. त्यामुळे दिवसाचा खेळ दुपारपर्यंत संपेल. तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका हा सामना दुपारी सुरु होणार असल्याने या सामन्यातील दिवसाचा खेळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील ५ दिवस पर्वणी असणार आहे. कारण त्यांना नाताळाच्या सुट्यांची मजा घेत असताना दिवसभरात क्रिकेट सामनेही पाहाता येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अशी ४ कारणे, ज्यामुळे भारतीय संघ जिंकू शकतो बॉक्सिंग डे कसोटी
‘भारतीय संघ दबावात असेल, तर मी खूप खुष आहे’
‘ऍडलेडचा पराभव न विसरता मेलबर्न सामन्यात भारताने करावी नव्याने सुरुवात’, माजी दिग्गजाचा सल्ला
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
…अन् पियुष चावलाने घेतलेल्या त्या विकेटचा एका वर्षात सचिनने घेतला बदला