Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन दिग्गज कर्णधार, ज्यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला सलग तीन आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचवलं

November 22, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Sourav Ganguly

Photo Courtesy: Twitter/ICC


क्रिकेटमध्ये नेहमीच उत्कृष्ट खेळाडूंनी आपलं खेळाच प्रदर्शन केलं आहे. काही जणांनी संघाचं प्रतिनिधित्व करताना यश प्राप्त केलंय. क्लाइव्ह लॉयड, इमरान खान, कपिल देव, रिकी पाँटिंग, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ह्यांची मोजणी जगातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. कारण ह्यांच्या कर्णधारपदी असताना संघाने उत्तुंग यश प्राप्त केलं.

ह्या कर्णधारांनी दाखवून दिलं अशक्य असं काही नसतं. काही कर्णधार असे होऊन गेले, ज्यांनी आपल्या संघाला सलग ३ आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवल आहे, आज आपण त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत.

ह्या ३ कर्णधारांनी सलग ३ वेळा आयसीसी टूर्नामेंटमध्ये अंतिम फेरीत पोहचवलं

१. क्लाइव्ह लॉयड
साधारण ८०च्या दशकात वेस्ट इंडीजच नाव होतं. त्यावेळी वेस्ट इंडीजचा कर्णधार क्लाइव्ह लॉयड होता. क्लाइव्ह लॉयड कर्णधारपदी असताना विंडीजने सलग २ वेळा विश्वचषक जिंकला आणि तिसऱ्यांदा देखील ते अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते.

क्लाइव्ह लॉयडच्या कर्णधारपदी असताना वेस्ट इंडीजने पहिला विश्वचषक १९७५साली जिंकला. नंतर १९७९ मध्ये सुद्धा वेस्ट इंडीज विश्वविजेता झाली. त्याच्याच नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडीजला १९८३ च्या अंतिम फेरीत देखील पोहचले, पण त्यांना कपिल देव कर्णधार असलेल्या भारतीय संघाने हरवलं. ह्यामुळे क्लाइव्ह लॉयड सलग ३ आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरी खेळणारे कर्णधार बनले.

२. सौरव गांगुली
एमएस धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानलं जातं, कारण त्याने ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या.पण ह्याआधी भारताचे कर्णधार सौरव गांगुली होते. सौरव गांगुली उत्कृष्ट कर्णधार होते, त्यांनी झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, युवराज सिंग ह्या सगळ्यांना घडवलं आहे.
गांगुलीने कर्णधारपदी असताना संघाला ३ वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यामध्ये पोहचवलं. पहिले भारतीय संघ २००० चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचला. ह्यानंतर २००२ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नंतर २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत पोहचला, जिथे ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

३. केन विलियम्सन
काही वर्षांपूर्वी किवी संघाचं प्रदर्शन आयसीसी स्पर्धांमध्ये एवढं खास नव्हतं, पण जेव्हा पासून केन विलियम्सन कर्णधार झाला, तेव्हापासून सगळं बदललं आहे. संघाचं प्रदर्शन बघून प्रेक्षकसुद्धा प्रभावित झाले आहेत. विलियम्सन कर्णधारपदी असताना न्यूझीलंड सलग ३ वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचले आहे.

सर्वात पहिले म्हणजे विलियम्सन कर्णधार असताना न्यूझीलंड २०१९ च्या विश्वचषक अंतिम फेरीमध्ये पोहचले. ह्याच्या एक वर्षानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. नुकताच झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले.

महत्त्वाच्या बातम्या – 

लाईव्ह सामन्यात कर्णधार ब्रावोचा सावळा गोंधळ, प्लेइंग इलेव्हन सांगताना नाव घेतलं एकाचं अन् खेळला भलताच 

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीसाठी ३ फिरकी गोलंदाजांना मिळणार संधी? पाहा ग्रीनपार्कचा आतापर्यंतचा इतिहास

दीपक चाहरचा ९५ मीटर लांब षटकार पाहून कर्णधार रोहितही चकीत; दिली अशी रिॲक्शन


Next Post
suryakumar-yadav

सूर्यकुमारचा झाला कसोटी संघात समावेश? कानपूरमध्ये करू शकतो पदार्पण

ravi-shastri

शास्त्री गुरुजींचे मोठे विधान; "माझ्या कार्यकाळात दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असत्या, मात्र..."

v-iyer

"वेंकटेशच्या गोलंदाजीने भविष्यासाठी रोहितचा आत्मविश्वास वाढला असेल''

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143