मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला गेला, जो इंग्लंडने जिंकला. विश्वचषकादरम्यान श्रीलंकेचा अष्टपैलू दानुष्का गुणथिलका चांगलाच चर्चेत राहिला. गुणथिलकावर ऑस्ट्रेलियातील एका महिलेने लैंगीक शोषणाचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्याला श्रीलंकन संघ थांबलेल्या हॉटेलमधून पोलिसांना ताब्यात घेतले होते. पण आता या प्रकरणात गुणथिलकाला दिलासा मिळताना दिसत आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार गुणथिलका (Danushka Gunathilaka) विरोधातील तीन आरोप माघारी घेतले गेले आहेत. त्याच्यावर आरोपी महिलेकडून एकूण चार वेगवेगळे आरोप लावले गेले होते. माहितीनुसार गुणथिलका या महिलेला एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून भेटला होता. नंतर दोघांची ओळख आणि चांगली मैत्री झाली. पण काही दिवसांनंतर दोघांचे संबंध बिघडले आणि 29 वर्षीय महिलेकडून गुणथिलकाविरोधात लैंगीक शोषणाचे आरोप केले गेले. माध्यमांतील वृत्तांनुसार, “सरकारी वकील ह्यूज बडिन यांनी न्यायलायात सांगितले की, एक आरोप सिद्ध होत आहे. पण बिना सहमतीने लैंगीक शोषणाचे तीन आरोप माघारी घेतले गेले आहेत.”
मागच्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषका गुणथिलका श्रीलंकन संघाचा भाग होता. विश्वचषाकत नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो श्रीलंकेच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग देखील होता. पण त्यानंतर दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला. त्याच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने श्रीलंकन संघासाठी 8 कसोटी, 45 एकदिवसीय आणि 46 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 299 धावा आहेत, तर वनडेत थ्याने 1601 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये तो 741 धावा करू शकला आहे. गोलंदाजीच्या रूपात त्याच्या नावावर एकूण 15 आंतरराष्ट्रीय विकेस्टची नोंद आहे. (Three charges of sexual abuse against Danushka Gunathilaka have been withdrawn)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जवळच्या आणि प्रिय लोकांनीही साथ सोडली’, निवड समितीचे अध्यक्षपद गेल्यानंतर चेतेश शर्मा अडचणीत
BREAKING: घाटात पुन्हा होणार भिर्रर्रर्र… बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींचा लढा यशस्वी