पूर्वी क्रिकेट काही मोजक्याच देशांमध्ये खेळले जायचे. मात्र नंतर जगभरातून या खेळासाठी ओढ निर्माण झाली. त्यामुळे हळूहळू जगभरात क्रिकेटचा प्रसार होऊ लागला. पूर्वीपेक्षा सध्याच्या क्रिकेटचे स्वरूप आणि नियम यांच्यात काळानुसार अनेक बदल झाले आहेत. त्याचबरोबर क्रिकेटबाबतची लोकप्रियता देखील वाढली आहे.
अगदी गल्लीबोळातही क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचे आपल्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असते. त्यात देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर चांगले प्रदर्शन राहिले तर, लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छाही जागृत होते. ज्यामुळे क्रिकेटमध्ये जास्त काळ खेळण्याची देखील संधी मिळते.
क्रिकेट जगतात असेही काही खेळाडू होते, ज्यांनी अत्यंत कमी वयात आपल्या राष्ट्रीय संघात पदार्पण करून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटीमध्ये पाकिस्तान संघात सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंची संख्या सर्वात जास्त होती. त्याचबरोबर बांगलादेशच्या कसोटी संघातही असे खूप खेळाडू होते, ज्यांनी कमी वयात पदार्पण करून देशाचे प्रतिनिधित्व केले.
तसेच आपल्या भारतातही असे काही खेळाडू होऊन गेले, ज्यांनी तरुण वयातच कसोटीमध्ये पदार्पण करून जगभरात मोठमोठे पराक्रम केले. कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर खेळाडूकडून चांगल्या खेळीचे अपेक्षाही केल्या जातात. कारण त्यांना पुढे खेळण्यासाठी बराच कालावधी मिळतो, ज्यामध्ये त्यांच्याकडून अनेक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता असते.
नुकत्याच पाकिस्तानच्या नसीम शाहने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज आपण अशाच ३ खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांनी अत्यंत अल्पवयातच क्रिकेटमध्ये पदार्पण करून देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
मुश्ताक मोहम्मद –
गुजरातच्या जुनागडमध्ये मुश्ताक मोहम्मद यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर त्यांचे पूर्ण कुटुंब पाकिस्तानला वास्तव्यास गेले. मुश्ताकने पाकिस्तानसाठी १९५९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुश्ताकने त्यांच्या कारकिर्दीत एकूण ५७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी १०० डावात ३६४३ धावा केल्या होत्या, ज्यात १० शतक आणि १९ अर्धशतक लगावले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या २०१ आहे. मुश्ताकने त्याचा शेवटचा कसोटी सामना १९७९ मध्ये खेळला होता. पदार्पणाच्या वेळी त्याचे वय केवळ १५ वर्षे आणि १२४ दिवस एवढेच होते.
सचिन तेंडुलकर –
सचिन तेंडुलकर केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आजही सचिनच्या नावे अनेक विश्वविक्रम प्रस्थापित आहेत. सचिनने १९८९ मध्ये १६ वर्ष २०५ दिवसांच्या वयातच कराचीच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले होते. सचिन तेंडुलकरने २४ वर्षाच्या कारकिर्दीत एकूण २०० कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १५९२१ धावा आणि ५१ शतक बनवण्याचा एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. जो आजही कायम आहे. सचिन तेंडुलकरची २४८ धावा ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
मुशफिकुर रहीम –
बांगलादेशचा सध्या खेळात असलेला यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या, या खेळाडूने १६ वर्ष २६७ दिवसांच्या वयात लॉर्ड्सच्या मैदानात २००५ साली इंग्लंड विरुद्ध बांगलादेशकडून कसोटी संघात पदार्पण केले होते. रहीम अजूनही बांगलादेश संघातून खेळत असून त्याने आतापर्यंत ७५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात ७ शतक आणि २३ अर्धशतकाच्या जोरावर ४६९६ धावा केल्या आहे. ज्यामध्ये २१९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्वाच्या बातम्या –
–पुजाराच्या फ्लॉप खेळीवर चहूबाजूंनी टीका; ‘एंड ऑफ द एरा’ म्हणत अनेकांनी दिल्या निवृत्तीच्या शुभेच्छा
–राहुलच्या शतकानंतर भलताच खूष झाला हिटमॅन, म्हणाला…
–व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत