भारतीय क्रिकेटमधील तीन माजी दिग्गज कर्णधारांचे या आठवड्यात वाढदिवस आहेत. जेव्हाही भारतीय क्रिकेट इतिहासाबद्दल बोललं जात तेव्हा या तीन क्रिकेटपटूंची नाव ओघानेच येतात.
सुनील गावस्कर
लिटिल मास्टर अशी ओळख असणाऱ्या सुनील गावस्कर यांचा वाढदिवस हा १० जुलै रोजी असतो. १० जुलै १९४९ साली सुनील गावस्कर यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १२५ सामन्यात ५१. १२ च्या सरासरीने तब्बल १०१२२ धावा केल्या आहेत. तसेच ३४ शतकंही केली आहेत. सर्वाधिक शतकांचा विक्रम हा त्यांच्या नावावर पुढे बरीच वर्ष होता. त्यांनी एकूण ३७ एकदिवसीय तर ४७ कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं. ते सोमवारी आपला ६८वा वाढदिवस साजरा करत आहेत.
सौरव गांगुली
दादा अशी ओळख असणारा सौरव गांगुली ०८ जुलै रोजी आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. गांगुलीचा जन्म ०८ जुलै १९७२ रोजी कोलकाता येथे झाला. गांगुलीने ४९ कसोटी सामने आणि १४६ एकदिवसीय सामन्यांत भारताचं नेतृत्व केलं. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००३ च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती.
एम. एस. धोनी
कॅप्टन कूल अशी अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार उद्या अर्थात ७ जुलै रोजी आपला ३६वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीचा जन्म ०७ जुलै १९८१ रोजी रांची येथे झाला. कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने भारतीय कर्णधारपदी असणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. त्याने १९९ एकदिवसीय सामने, ७२ टी२० सामने आणि ६० कसोटी सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ टी२० विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०११ विश्वचषक जिंकले आहेत.