2019 विश्वचषकाची स्पर्धा जशीजशी पुढे सरकत आहे, तसे सर्व संघांना खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्या भेडसावत आहेत. अनेक संघाचे खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंना काही सामन्यांना मुकावही लागले आहे.
तर आत्तापर्यंत तीन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर गेले आहेत. यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचाही समावेश आहे. तो अंगठ्याच्या दुखापतीमुळे या विश्वचषकाच्या बाहेर गेला आहे.
हे तीन खेळाडू पडले 2019 विश्वचषकातून बाहेर –
शिखर धवन – भारताचा सलामीवीर फलंदाज शिखरच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने तो या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पॅट कमिन्सने टाकलेला एक चेंडू अंगठ्याला लागला होता. त्यामुळे त्याला या दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.
त्याने या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामने खेळले. यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 117 धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 धावा केल्या होत्या. शिखरच्या ऐवजी या विश्वचषकासाठी रिषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
मोहम्मद शेहजाद – अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजाद हा देखील या विश्वचषकातून बाहेर गेला आहे. त्याला गुडघ्याची दुखापत असल्याचे सांगण्यात आले आहे.
पण शेहजादने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तो फिट असतानाही त्याला संघातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तानने त्याच्या ऐवजी 18 वर्षीय इक्रम अली खीलची विश्वचषकासाठी संघात निवड केली आहे.
डेल स्टेन – 2019 विश्वचषक सुरु झाल्यानंतर काही दिवसातच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला होता. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता या विश्वचषकातून बाहेर पडला.
त्याला यावर्षीच्या आयपीएल दरम्यान खांद्याच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो आयपीएलमधून केवळ दोन सामने खेळल्यानंतर मायदेशी परतला होता. तो विश्वचषकापर्यंत या दुखापतीतून बरा होईल अशी दक्षिण आफ्रिकेला आशा होती.
परंतू विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेचे पहिले दोन सामने झाल्यानंतरही तो फिट झाला नसल्याने त्याला विश्वचषकातून बाहेर जावे लागले. त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या संघात ब्युरन हेन्ड्रिक्सचा समावेश करण्यात आला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–न्यूझीलंडच्या या खेळाडूने कर्णधार विलियम्सनला केले ट्रोल, जाणून घ्या कारण
–ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात घडला इतिहास; विश्वचषकात पहिल्यांदाच झाले असे
–युवराज सिंग आता खेळणार या स्पर्धेत!