इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत २२ सामने खेळवले गेले आहेत. मुंबई, पुण्याच्या स्टेडियमवर होत असलेल्या या हंगामात नवे संघ दमदार प्रदर्शन दाखवत आहेत, तर काही जुने संघ नव्या संघांपुढे फिके पडल्याचे दिसत आहेत. केवळ संघच नव्हे तर खेळाडूंबाबतही अशीच काहीशी स्थिती आहे. एकीकडे नवे खेळाडू त्यांची छाप सोडत आहेत. तर जुन्या खेळाडूंचे प्रदर्शनही वरचे वर चांगले होत चालले आहे. या लेखात आपण अशाच काही खेळाडूंबद्दल वाचणार आहोत, जे आयपीएल २०२१मध्ये पूर्णपणे फ्लॉप झाले होते, परंतु आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे.
१. शिवम दुबे-
आयपीएल २०२२पूर्वी कदाचित अनेकांना शिवम दुबेचे (Shivam Dube) नाव माहितीही नसेल. यामागचे कारण आहे, त्याचे आयपीएल २०२१मधील (IPL 2021) प्रदर्शन. मागील वर्षी दुबेने खूपच खराब प्रदर्शन केले होते. तो मागील वर्षी राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्याने या हंगामात ९ सामने खेळताना तो २३० धावाच करू शकला होता. यामध्ये केवळ एका अर्धशतकाचा समावेश होता. परंतु चालू हंगामात त्याचे प्रदर्शन कमाल राहिले आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात ५ सामने खेळले असून तब्बल २०७ धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद ९५ धावा इतकी राहिली आहे, जी त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळली होती.
२. लियाम लिविंगस्टोन-
लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्या हंगामात त्याला केवळ ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. या ५ सामन्यांमध्ये त्याने त्याने अतिशय लाजिरवाण्या ८.४० च्या सरासरीने केवळ ४२ धावा केल्या होत्या. परंतु आयपीएल २०२२मध्ये त्याची पंजाब किंग्ज संघात एन्ट्री झाली आणि त्याच्या प्रदर्शनाला बहर आला. त्याने आयपीएल २०२२ मध्ये ५ सामने खेळताना मागील हंगामापेक्षा तिप्पट धावा काढल्या आहेत. त्याने आतापर्यंत ५ सामने खेळताना २ अर्धशतकांच्या १६४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
३. दिनेश कार्तिक-
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) आयपीएल २०२२मधील प्रदर्शन मागील हंगामाच्या एकदम उलट राहिले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग असताना कार्तिकने आयपीएल २०२१ मध्ये जेमतेम २२३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी केवळ ४० इतकी राहिली होती. परंतु या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून फिनिशरची भूमिका बजावत आहे. त्याने आतापर्यंत ५ सामने खेळताना १३१ च्या सरासरीने १३१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याच्या अंतिम षटकातील प्रदर्शनांमध्ये बेंगलोरने बरेचसे सामनेही जिंकून दिले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
स्वागत करू नववर्षाचे! चेन्नईच्या खेळाडूंकडून तमिळ नवीन वर्ष जल्लोषात साजरे, पाहा Video
सामन्यानंतर कर्णधार मयंक अगरवालला फलंदाजी टिप्स देताना दिसला सचिन तेंडुलकर, व्हिडिओ व्हायरल