भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये बुधवारपासून (०४ ऑगस्ट) कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची अंतिम ११ खेळाडूंमध्ये अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला स्थान देण्यात आले नाही. कसोटी मालिकेपूर्वी अनेक दिग्गजांनी अश्विन पहिल्या कसोटीत खेळणार असल्याची अटकळ बांधली होती. मात्र, भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला बाकावर बसवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
भलेही कर्णधार विराटने अश्विनला पहिल्या कसोटीत संधी दिली नाही. पण तो अशी काही कारणे आहेत, ज्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी प्रबळ दावेदार होता. त्याच कारणांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे. चला तर पाहूया, कोणती आहेत ती कारणे?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रविचंद्रन अश्विनला का संधी द्यायला हवी होती याची ३ कारणे
३. अश्विनची अलीकडची परदेशातील कामगिरी उल्लेखनीय
अश्विनला भारतात जबरदस्त यश मिळाले आहे. मात्र, घराबाहेरच्या त्याच्या आकडेवारीने नेहमीच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कसोटीमध्ये अश्विनची गोलंदाजीची सरासरी ऑस्ट्रेलियामध्ये ४२.१५, इंग्लंडमध्ये २८.११, दक्षिण आफ्रिकेत ४६.१४ आणि न्यूझीलंडमध्ये ३३ आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत अश्विनने परदेशात चांगली कामगिरी केली आहे आणि भरपूर विकेट्सही मिळवल्या आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनने १२ विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही चमकदार गोलंदाजी केली होती.
अशा परिस्थितीत, अश्विनच्या अलीकडील कामगिरीचा विचार करता, त्याला पहिल्या सामन्यात न खेळवण्याचा निर्णय स्पष्टपणे चुकीचा वाटतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या पर्वाच्या शेवटच्या मालिकेत भारताने इंग्लंडविरुद्ध मायभूमीत कसोटी मालिका खेळली होती. यादरम्यान संघाने इंग्लंडचा ३-१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताच्या मालिका विजयात अश्विनचा मोलाचा वाटा होता. अश्विनने इंग्लंडविरुद्ध चारही कसोटी खेळल्या आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला. त्याने मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या. अगदी दुसऱ्या कसोटीत चेन्नईच्या मैदानावर त्याने शानदार शतकही झळकावले होते.
अश्विनने त्या मालिकेदरम्यान इंग्लंडच्या फलंदाजांना अनेक वेळा बाद केले होते आणि ते खेळाडूही या कसोटी मालिकेचा एक भाग आहेत. अशा स्थितीत जर अश्विनला संधी मिळाली असती तर विरोधी फलंदाज थोडे घाबरले असते.
२. अश्विनने काउंटी खेळून तयार केले
विश्व टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यानंतर बहुतेक भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुट्टी घालवत होते. मात्र, अश्विनने समरसेटविरुद्ध सर्रे संघाकडून काउंटी चॅम्पियनशिप खेळली होती. अश्विनने पहिल्या डावात फक्त एक विकेट घेतली पण दुसऱ्या डावात तो पूर्णपणे लयीत दिसला आणि ६ फलंदाजांना त्याचा बळी बनवले. अश्विनला इंग्लंडमधील परिस्थिती इतर कोणत्याही फिरकी गोलंदाजापेक्षा चांगली माहीत होती आणि भारताने पहिल्या कसोटीत अश्विनला खेळून याचा फायदा घ्यायला हवा होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टी-ट्वेंटी वर्ल्डकपचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहाता येणार का? पाहा काय म्हणतायेत आयोजक
कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत
बटलर बाद होण्यापूर्वी विराटने केली होती भविष्यवाणी; पुढील चेंडूवरच झाला असा गेम, पाहा व्हिडिओ