भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर संघाने आतापर्यंत एकूण ५५४ कसोटी सामने खेळेले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी भारतीय संघ १६३ वेळा जिंकला आहे आणि १७१ वेळा संघाला पराजयाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यांपैकी २१९ सामने अनिर्णीत राहिले आहेत आणि केवळ १ सामना बरोबरीत सुटला आहे.
या ५५४ सामन्यांमध्ये सर्वात जास्त १२९ कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. याव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२ कसोटी सामने आणि वेस्ट इंडीजविरुद्ध ९८ कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाने न्यूझीलँँड (६०) आणि पाकिस्तान (५९) यांच्याविरूद्ध ५० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३०-३० विजय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवले आहेत.
या लेखात आपण नजर टाकणार आहोत अशा ३ संघांवर, ज्यांनी भारतीय संघाला सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये हरवले आहे.
१. इंग्लंड (४९ कसोटी सामने)
इंग्लंडविरुद्ध भारताने सर्वाधिक १२९ कसोटी सामने खेळले आहेत आणि सर्वाधिक ४९ कसोटी सामन्यात पराजयही त्यांच्याच विरोधात झाला असून भारतानेही इंग्लंडला ३० कसोटी सामन्यांमध्ये हरवले आहे. तसेच दोन्ही संघामधील ५० कसोटी सामने अनिर्णीत झाले आहेत. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये लार्ड्स मैदानावर झाला होता आणि इंग्लंडने १५८ धावांनी या सामन्यात विजय मिळवला होता. हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी सामना होता.
२. ऑस्ट्रेलिया (४३ कसोटी सामने)
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०२ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने या सामन्यांमधील ३० सामन्यांमध्ये विजया मिळवला आहे आणि ४३ सामन्यांमध्ये पराजयाचा सामना करावा लागला आहे. या दोन संघांमध्ये एक सामना बरोबरीत सुटला आहे.
या दोन संघांमध्ये पहिला सामना १९४७ मध्ये ब्रिस्बेन येथे झाला होता. ऑस्ट्रेलियाने एकाच डावात २२६ धावा केल्या आणि सामन्यात एकतर्फी विजयच मिळवला होता. दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना २०२०-२१ मध्ये झाला आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती आणि या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात २-१ ने हरवले होते.
३. वेस्ट इंडीज (३० कसोटी सामने)
भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध ९८ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला २२ सामन्यांमध्ये विजय मिळाला असून ३० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांपैकी ४६ सामने अनिर्णीत झाले आहेत.
या दोन संघांमधील पहिला कसोटी सामना १९४८ मध्ये दिल्लीमध्ये झाला होता आणि हा सामना अनिर्णीत झाला होता. या दोन संघातील शेवटचा कसोटी सामना २०१९ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यापद स्पर्धेदरम्यान झाला होता आणि भारताने या मालिकेत वेस्टइंडीजला २-० ने हरवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या अडचणीत वाढ, अव्वल फलंदाजाची ‘या’ कारणामुळे टी२० विश्वचषकातून माघार
बांगलादेशच्या अडचणीत वाढ, अव्वल फलंदाजाची ‘या’ कारणामुळे टी२० विश्वचषकातून माघार