---Advertisement---

टी२० सामन्यात चहलने दिल्या तब्बल ६४ धावा, तरीही कॅप्टन धोनीने दिली ‘कूल’ प्रतिक्रिया; वाचा किस्सा

Yuzvendra-Chahal-MS-DHoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युझवेन्द्र चहल (yuzvendra chahal) हा सध्या भारतीय संघात (team india) स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्याने २०१६ मध्ये महेंद्रसिंग धोनी (m.s dhoni) कर्णधार असताना आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. धोनी कर्णधार असताना त्याने चांगली कामगीरी केली होती. विकेटच्या मागे धोनी ज्यापद्धतीने युझीची मदत करायचा, ते सर्वांनाच माहित आहे. चहल आणि धोनी यांच्यातील संवाद कित्येकदा स्टंप माईकवर कैद झाला आहे. धोनी विकेटच्या मागे मदत करायचा हे चहलने सुद्धा अनेकदा कबुल केले आहे. आता चहलने धोनीबद्दल एक किस्सा सांगितला आहे.

फक्त चहलनेच नाही तर कुलदीप यादवनेही कबुली दिली आहे की, धोनी विकेटच्या मागून गोलंदाजांना खूप मदत करायचा. मग ती क्षेत्ररक्षणाबाबत असो किंवा फलंदाजीबाबत असो. तसेच तो गोलंदाजांना कोणता चेंडू टाकायचा आहे? हे सुद्धा सांगत असे. धोनीनंतर या दोघांच्या कामगिरीत ही मोठी घसरण झाली आहे. युझवेन्द्र चहलने वरिष्ठ फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसोबत बोलताना २०१८ च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान घडलेला धोनीबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे. धोनीने त्याला असा धडा शिकवला होता, जो त्याच्या अजूनपर्यंत लक्षात आहे.

हेही वाचा- कान्ट वेट टू गेट स्टार्टेड; रोहित मैदानात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक, १०००व्या वनडेत सांभाळणार नेतृत्त्वपद

चहल म्हणाला, “एकदा दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टी२० मालिका सुरु असताना मी ४ षटकांत ६४ धावा दिल्या होत्या. हेनरिक क्लासेन माझ्या गोलंदाजीवर मैदानाच्या कानाकोपऱ्यात शाॅट मारत होता. माही भाईने मला राऊंड द विकेट गोलंदाजी करायला सांगितली. मी तशी गोलंदाजी केली आणि एक षटकार गेला. क्लासेनने मिड विकेटच्या सर्वात लांब बाऊंड्रीवर षटकार मारला. मग माही भाई माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले माही भाई आता काय? ते म्हणाले, काही नाही. मी असाच तुझ्याकडे आलो आहे. ते म्हणाले की, आज तुझा दिवस नाहीये, तु प्रयत्न करत आहे पण यश मिळत नाहीये. जास्त विचार करु नकोस. तुझी ४ षटके संपव आणि चिल कर.”

त्यावेळी धोनीचा पाठिंबा मला उपयोगी पडला आणि मला हे कळाले की आपण प्रत्येकवेळी चांगली कामगीरी करु शकत नाही, असे चहलने म्हटल आहे. तो म्हणाला की, “कित्येकदा आपल्याला कोणी ओरडते, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो. पण त्यांनी मला सांगितले की हा एक सामना आहे. तू एकदिवसीयमध्ये चांगला खेळला तर तू प्रत्येकवेळी चांगली कामगीरी करशील असे नाही. बाकीचे सुद्धा खेळत आहेत. कधी तुम्ही चांगली कामगीरी करता, कधी नाही करत, तर कधी कधी तुमचा दिवस नसतो. त्यामुळे मी याच्यामधून हेच शिकलो की जेव्हा तुमचा दिवस नसतो, तेव्हा तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही.”

महेंद्रसिंग धोनीने भारतीय कसोटी संघातून २०१४ ला निवृत्ती घेतली होती. त्यानंतर २०१७ ला भारताच्या एकदिवसीय आणि टी २० संघातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर विराट कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनवले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

मेगा ऑक्शनआधी फ्रॅंचाईजींची वाढली डोकेदुखी! बीसीसीआयने घालून दिले नवे नियम; वाचा सविस्तर

कान्ट वेट टू गेट स्टार्टेड; रोहित मैदानात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक, १०००व्या वनडेत सांभाळणार नेतृत्त्वपद

मोहन बागान सातत्य राखण्यास उत्सुक; फॉर्म नसलेल्या मुंबई एफसीविरुद्ध पारडे जड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---