---Advertisement---

कान्ट वेट टू गेट स्टार्टेड; रोहित मैदानात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक, १०००व्या वनडेत सांभाळणार नेतृत्त्वपद

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 5:18 PM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi & t20i series) यांच्यात ६ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, तर १६ फेब्रुवारीपासून उभय संघातील टी-२० मालिकेची सुरुवात होईल. भारतीय संघाचा नवीन कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) एकदिवसीय मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहे. या मालिकेतील पहिलाच सामना भारतीय संघाचा १००० वा एकदिवसीय सामना असेल.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. अशात वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत पुनरागमन करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. या गोष्टीची माहिती रोहितने स्वतः एक सोशल मीडिया पोस्ट करून दिली आहे.

रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून ही पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. फोटोत रोहित खेळपट्टीवर उभा आहे आणि आकाशाकडे पाहत आहे. फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कान्ट वेट टू गेट स्टार्टेड.” याचाच अर्थ असा होतो की, तो मैदानावर पुनरागमन करण्यासाठी तो तयार आहे आणि यासाठी अधिक वाट पाहण्याची त्याच्याकडे क्षमता नाहीय. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CZdwsjlhn5n/?utm_source=ig_web_copy_link

दक्षिण आफ्रिकी दौऱ्यापूर्वी अचानक रोहितचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेल्यामुळे त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत सहभागी होता आले नव्हते. दरम्यानच्या काळात रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) दुखापतीवर उपचार आणि सराव करत होता. वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका, रोहितसाठी नियमित एकदिवसीय कर्णधाराच्या रूपातील पहिली मालिका असणार आहे.

रोहितकडे आता भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले गेले आहे आणि अशात त्याला दुखापत होणे संघासाठी आणि वैयक्तिक त्याच्यासाठी महागात पडणार आहे. भारतीय संघाचे यापूर्वीचे कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहली खूपच तंदुरुस्त होते आणि याच कारणास्तव कारकिर्दीत खूप कमी वेळा त्यांना दुखापतीमुळे संघातून बाहेर बसावे लागले होते. रोहितला देखील स्वतःच्या फिटनेसवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. एनसीएमध्ये घालवलेल्या मागच्या काही दिवसांमध्ये रोहितने ५-६ किलो वजन कमी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

मुंबई आणि सीएसकेसह तब्बल पाचवेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणारा ‘हा’ भिडू आहे तरी कोण?

‘किंग कोहली’चा १०० वा कसोटी सामना असेल खास! जाणून घ्या नेमक कारण

कॅप्टन जोमात! उपांत्य सामन्यापूर्वी यश धूलने दाबली ऑस्ट्रेलियाची दुखरी नस; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---