भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळाच दबदबा होता. जागतिक स्तरावरील सर्वच गोलंदाज धोनीच्या आक्रमक खेळीला घाबरत असत. कारण धोनीजवळ प्रत्येक चेंडूवर शॉट मारण्याची क्षमता होती. तो गोलंदाजाचाही एकही खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची संधी दवडत नसे.
साल 2006 मध्ये असेच काहीसे घडले होते, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात फैसलाबाद येथे कसोटी सामना सुरू होता. तेव्हा धोनी आणि पाकिस्तानचा फिरकीपटू दानिश कानेरिया या दोन्ही खेळाडूंमध्ये सामना सुरू असताना मैदानावर तणाव निर्माण झाला होता आणि अखेर धोनीने त्याचे उत्तर गगनचुंबी षटकारासह दिले होते.
या सामन्यात जेव्हा धोनी 39 धावावर फलंदाजी करत होता; तेव्हा पाकिस्तान संघाचा फिरकीपटू कानेरियाने वेगात धोनीकडे थ्रो फेकला होता, जो खूप खतरनाक होता. हा थ्रो येताच जर धोनी बाजूला सरकला नसता तर हा चेंडू जाऊन धोनीच्या डोक्याला लागला असता. या सर्व प्रकारानंतर धोनी देखील शांत बसला नाही. त्यानंतर धोनीने कानेरियाला आपल्या पद्धतीने प्रतिउत्तर दिले होते. कानेरियाने टाकलेल्या चेंडूवर त्याने पुढे येऊन गगनचुंबी षटकार मारला होता.
या सामन्यात धोनीने आपल्या कसोटी कारकीर्दीचे पहिले शतक झळकावले होते. धोनीने 153 चेंडूत 148 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 19 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. परंतु हा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. पण धोनीने हा डाव धैर्याने खेळला होता.
https://www.instagram.com/tv/CQpSINmgMB-/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धची ही कसोटी मालिका 1-0 ने गमावली होती. त्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला 4-1 ने पराभूत केले होते. या मालिकेत महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा साथीदार युवराज सिंग यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचे वर्चस्व राखून ठेवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत आझमचे ‘विश्वविक्रमी’ शतक, कोहली-वॉर्नरलाही सोडले मागे
ख्रिस गेलने बॅटवरून का हटवले ‘युनिव्हर्स बॉस’चे स्टिकर? ऐका त्याच्याच तोंडून
‘दादा’ची दादागिरी आता रुपेरी पडद्यावर! २५० कोटींच्या बजेटचा बायोपिक; पण अभिनेता कोण?