भारतीय क्रिकेट संघात आजवर अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. प्रत्येक खेळाडूला त्याच्या घरच्या मैदानाबाबत नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूने देशासाठी विशेष कामगिरी केल्यास त्याच्या घरच्या मैदानातील एका स्टँडला त्याचे नाव देण्याची भारतीय क्रिकेटची जुनी परंपरा आहे. याच दिग्गज खेळाडूंच्या यादीत आता भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग आणि माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांचा समावेश झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहली येथील स्टेडियमच्या दोन स्टॅंडला या दोन दिग्गजांची नावे दिली गेली होती. आता आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यासाठी या दोन्ही स्टँडमधील तिकिटांची किंमत समोर आली आहे.
पीसीए स्टेडियमवर युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या नावाने नवीन स्टँड बनवण्यात आले आहेत. हे दोन्ही खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पंजाब राज्याचे प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे तेथील जगप्रसिद्ध मोहाली क्रिकेट स्टेडियममधील स्टँडला त्यांचे नाव दिल्याने चाहते भलतेच खूश झाल्याचे दिसत आहे. आता या स्टॅन्डमधील तिकीटाची किंमत किती असणार बाबतची माहिती समोर आली.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा तीन टी20 सामन्यांचा भारत दौरा 20 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिलाच सामना मोहाल येथे खेळला जाईल. या सामन्यासाठीच्या तिकिटांचे दर नुकतेच जाहीर करण्यात आले. नव्याने नामकरण झालेल्या हरभजन सिंग स्टॅन्डमधील तिकीटाची किंमत 5000 इतकी असेल. तर, युवराज सिंग स्टॅन्डच्या तिकिटाची किंमत 2000 इतकी असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला ड्रेसिंग रूममध्ये गाणी ऐकण्यास बंदी, वाचा संपूर्ण प्रकरण
विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’