---Advertisement---

एका मिसळ पावच्या किंमती एवढं महाग श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मॅचचं तिकीटं

Aaron Finch, Dasun Shanaka
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघांमध्ये ७ जून ते १२ जुलैदरम्यान २ सामन्यांची कसोटी, ५ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. यजमान श्रीलंका संघासाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आर्थिक संकटात असताना श्रीलंका संघासाठी या मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. दरम्यान या मालिकांसाठी तिकीट उपलब्ध झाले आहेत. परंतु या तिकीटांची किंमत मात्र खूपच कमी आहे.

श्रीलंकेतील (Australia Tour Of Sri Lanka) आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम कोलंबो, पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम पल्लेकेले आणि गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियम गॉल येथे हे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी तिकीट उपलब्ध झाले आहेत. कोलंबोतील प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांसाठीच्या तिकीटांची किंमत श्रीलंकेतील चलनानुसार ३०० एलकेआरपासून सुरुवात होत आहे. ज्याची किंमत भारतीय चलनानुसार केवळ ६४.६४ रुपये इतकी आहे. तर सर्वात महागडे तिकीट ५००० एलकेआर म्हणजे १०७६.२२ रुपये इतक्या किंमतीचे (Tickets Price of SLvsAUS Matches) आहे.

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यांसाठी सर्वात स्वस्त तिकीट ३०० एलकेआर इतके असून सर्वात महागडे तिकीट ६५०० एलकेआर (भारतीय चलनानुसार १३९९.०९ रुपये) इतके आहे. तसेच गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधील तिकीटे सर्वात महागडी आहेत. येथेही ३०० एलकेआरपासून तिकीटे उपलब्ध असून सर्वात महागडे तिकीट ७५०० एलकेआर (भारतीय चलनानुसार १६१४.३३ रुपये) इतके आहे.

भारतातील क्रिकेट सामन्यांच्या तिकीटांच्या किंमतींशी याची तुलना करायची झाल्यास, ती फारच कमी दिसते. नुकत्याच भारतात झालेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्याच्या तिकीटांचे दर ८०० रुपयांपासून सुरू झाले होते. तर सर्वात महागडे तिकीट ६५ हजार रुपयांचे होते.

https://twitter.com/RoshanCricket/status/1532261643702632448?s=20&t=RMa95u7TahbZTlwGjNOhUg

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकांचे वेळापत्रक

टी२० मालिका
पहिली टी२०- ७ जून, कोलंबो
दुसरी टी२०- ८ जून, कोलंबो
तिसरी टी२०- ११ जून, पल्लेकेले

वनडे मालिका
पहिली वनडे- १४ जून, पल्लेकेले
दुसरी वनडे- १६ जून, पल्लेकेले
तिसरी वनडे- १९ जून, कोलंबो
चौथी वनडे- २१ जून, कोलंबो
पाचवी वनडे- २४ जून, कोलंबो

कसोटी मालिका
पहिली कसोटी- २९ जून ते ०३ जुलै, गॉल
दुसरी कसोटी- ०८ जुलै ते १२ जुलै, गॉल

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार

टी२० विश्वचषकासाठी माजी क्रिकेटरने निवडला भारतीय संघ, रोहित-विराटला डच्चू; तर कॅप्टन्सी ‘या’ खेळाडूकडे

‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---